Shahid Kapoor presented such a 'Rangoon' award for 'Valentine's Day'! | ​ शाहिद कपूरने अशा ‘रंगून’ अंदाजात दिल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या शुभेच्छा!

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाची सध्या प्रत्येकजण प्रतीक्षा करतोय. दुसºया महायुद्धाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट लवकरच रिलीज होताय. सध्या कंगना राणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे तिघे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत.  प्रमोशनल इव्हेंटमधील कंगनाच्या अनेक अदा तुम्ही पाहिल्यात. पण शाहिद कपूरचा ‘रंगूनिंग’ अंदाज तुम्ही कदाचित पाहिला नसेल.‘रंगून’च्या प्रमोशनमध्ये आता शाहिदनेही उडी घेतली आहे. पण त्याचा प्रमोशनचा अंदाज जरा वेगळा आहे. त्यासाठी शाहिदने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार. व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर शाहिदने हा व्हिडिओ अपलोड केला आहे, यालाही वेगळे कारण आहे. यात शाहिद बबलगमचा फुगवताना दिसतोय. हे बबलगम शेवटी हार्टशेप आकाराचे येते. आहे ना गंमत. आता व्हॅलेन्टाईन डे आणि शाहिदचा हा व्हिडिओ याचा संबंध तुम्हाला कळून चुकलाच असेल. या व्हिडिओद्वारे शाहिदने आपल्या चाहत्यांना व्हॅलेन्टाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय ‘रंगून’चे प्रमोशनही केले आहे.‘रंगून’या चित्रपटात शाहिदने नवाब मलिकची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर कंगना यात मिस ज्युलियाच्या भूमिकेत आहे.‘रंगून’ हा चित्रपट एक  ‘इंटेन्स लव्ह स्टोरी’ आहे. या पीरियड ड्रामाचा ट्रेलर लोकांना चांगलाच भावला आहे. याशिवाय यातील ‘मेरे पिया गये इंग्लंड’,‘ये इश्क’, ‘ब्लडी हेल’ आणि ‘टिप्पा’ या गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.  पीरियड रोमॅन्टिक ड्रामा असलेल्या या चित्रपटात प्रथमच सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत अशा तिघांचा एकत्र अभिनय पाहायला मिळणार आहे.  यात ‘वॉर’ आहे आणि ‘लव्ह’ सुद्धा.   सैफ या चित्रपटात एका रॉयल भूमिकेत दिसणार आहे.

ALSO READ : ​पाहा: ‘हंटरवाली’ कंगना राणौतचा हटके अवतार!!
Web Title: Shahid Kapoor presented such a 'Rangoon' award for 'Valentine's Day'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.