Shahid Kapoor and Shraddha Kapoor's time to stay in the hut? | ​शाहिद कपूर व श्रद्धा कपूरवर का आली झोपडीत मुक्काम करण्याची वेळ?

कुठल्याही चित्रपटाचे आऊटडोअर शूटींग असो, त्यातील लीड अभिनेता-अभिनेत्रीला पंचतारांकित हॉटेलात थांबवले जाते. याबाबतीत निर्माते जराही तडजोड करत नाहीत आणि लीड कलाकारही तडजोड स्वीकारायला तयार होत नाहीत. पण शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांना मात्र पंचतारांकित तर सोडा साधे हॉटेलही मिळाले नाही.   परिणामी दोघांनाही एका झोपडीत थांबावे लागले.
श्रद्धा व शाहिद कपूर सध्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात बिझी आहे. उत्तराखंडच्या टिहरी येथे या चित्रपटाचे शूटींग सुुरू आहे. याठिकाणी जवळपास कुठेही पंचतारांकित हॉटेल नाही. साहजिकच श्रद्धा, शाहिद आणि चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह या सगळ्यांना एका झोपडीत थांबावे लागले. युनिटच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी आधी एक पंचारांकित हॉटेल बुक केले होते. पण शूटींगच्या ठिकाणापासून ते तीन तासांच्या अंतरावर होते. या हॉटेलात लीड स्टार्स थांबले असते तर ३ तास जाणे आणि ३ तास येणे असा दिवसभराचा ६ तासांचा प्रवास करणे त्यांना भाग होते. पण हा ६ तासांचा प्रवास सर्वांच्याच जिवावर आला आणि मग सगळ्यांनी जवळच्याच एका झोपडीत थांबवण्याचा निर्णय घेतला. श्रद्धाही यासाठी लगेच तयार झाली. शाहिदच्या या चित्रपटात श्रद्धा एका वकीलाची भूमिका साकारते आहे. 
‘रंगून’ या चित्रपटाच्या शूटींगवेळीही शाहिद कपूर अरूणाचल प्रदेशातील एका गावात लहानशा कॉटेजमध्ये थांबला होता.

ALSO READ : घराजवळील कुंटणखान्यामुळे शाहिद कपूर अन् मीरा राजपूत झाले त्रस्त; सोडणार राहाते घर!

‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे.  वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या चित्रपटाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या चित्रपटासाठी शाहिदला राजी केल्याचे मानले जाते. या चित्रपटात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे.  या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिकाही शाहिद कपूरच्याच तोडीची असल्याचे कळतेय.  चित्रपटातील अभिनेत्रीला एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलावे लागणार आहे. Web Title: Shahid Kapoor and Shraddha Kapoor's time to stay in the hut?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.