अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद आणि मीरा राजपूत एका अशा कारणामुळे चर्चेत आहेत, ज्यामुळे त्यांनी चक्क राहाते घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार शाहिद आणि मीरा त्यांची जुहूस्थित प्रणेता अपार्टमेंट सोडण्याच्या विचार करीत आहेत. हे सोडण्यामागचे एकमेव कारण म्हणजे या परिवारात असलेला कुंटणखाना होय. शाहिदने हे अपार्टमेंट २०१४ मध्ये खरेदी केले होते. त्यावेळी तो बॅचलर होता. शाहिदच्या या घरापासून केवळ अर्ध्या किलोमीटरवर जुहू बीच आहे. मात्र याच परिसरात सेक्स वर्करचा व्यापार होत असल्याने शाहिद आणि मीना त्रस्त झाले आहेत. वृत्तानुसार सेक्स वर्कर्स आणि दलाल रस्त्यावर उभे असतात. ज्यामुळे शाहिदला या परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणे अवघड होत आहे. त्यामुळेच त्याने येथून घर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो पत्नी मीरा आणि मुलगी मीशासह बांद्रा येथे शिफ्ट होऊ शकतो. असे म्हटले जात आहे की, त्याठिकाणी तो एका फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात शाहिद अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळाला. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शाहिदने मेवाडचे राजे रतन सिंह यांची भूमिका साकारली. प्रेक्षकांना शाहिदचा अभिनय खूपच भावत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करीत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद पत्नी मीरासोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना बघावयास मिळाला होता. 
Web Title: Shahid Kapoor and Mira Rajput were injured due to family planning; Home to leave!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.