Shahid Kapoor and Kareena Kapoor face again, see video! | पुन्हा एकदा झाला शाहिद कपूर अन् करिना कपूरचा आमना-सामना, पहा व्हिडीओ!

अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्यातील एकेकाळच्या नात्याबद्दल सर्वच जाणून आहेत. सध्या दोघेही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात खूप पुढे गेले असून, वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. परंतु अशातही हे दोघे एकमेकांसमोर जाणे कटाक्षाने टाळतात. मात्र नुकतेच या दोघांचा आमना-सामना झाला असता, त्यांचे हावभाव बघण्यासारखे होते. एक्स कपल असलेले हे दोघे रेड कार्पेटवर समोरासमोर आले होते. परंतु या दोघांनी एकमेकांकडे फारसे लक्ष न देता इग्नोर करणे अधिक संयुक्तिक समजले. 

हा व्हिडीओ फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅण्ड स्टाइल अवॉर्डदरम्यानचा आहे. जेव्हा करिना कपूर रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवित कॅमेºयांना पोज देत होती, त्याचदरम्यान शाहिद त्याठिकाणी आला. तोपर्यंत करिना तेथून निघाली नव्हती. मात्र करिनाची शाहिदवर नजर पडताच तिने तेथून काढता पाय घेतला. तर करिना तेथून जाताच शाहिदने पुढे पाऊल टाकत छायाचित्रकारांना पोज दिल्या. या दोघांचा सध्या एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये हे दोघे एकमेकांना इग्नोर करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शाहिद आणि करिनाचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे आहेत. कारण दोघे याठिकाणी असल्याची त्यांना भनक लागल्यानंतर त्यांच्या चेहºयावरील संपूर्ण हावभावच बदलून गेले होते. दरम्यान, शाहिदबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर करिनाने सैफ अली खान याच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला सध्या तैमूर नावाचा मुलगा आहे. तर दुसरीकडे शाहिदने मीरा राजपूत हिच्याशी लग्न केले असून, मिशा नावाची या दाम्पत्याला मुलगी आहे. सध्या शाहिद आणि करिना दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूश आहेत. शाहिदने काही दिवसांपूर्वीच मुलगी मिशाचा वाढदिवस साजरा केला. तर तैमूरचा वाढदिवस लवकरच साजरा केला जाणार आहे. 
Web Title: Shahid Kapoor and Kareena Kapoor face again, see video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.