Shaheed responsible for dengue for education ?? | विद्याच्या डेंग्यूसाठी शाहीद जबाबदार??

होय, ऐकता ते खरे आहे. संपूर्ण बॉलिवूडने डेंग्यूचा धसका घेतला आहे. विद्या बालन डेंग्यूने आजारी पडली आहे. तिकडे इमरान हाश्मी याला मलेरियाने ग्रासले आहे. अनिल कपूर आणि जुही चावला यांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. डासांमुळे पसरणारे हे आजार रोखण्यासाठी महापालिकेनुकतीच एक मोहिम राबवली. त्यातून काही धक्कादायक खुलासे झालेत.  विद्याला डेंग्यू झाला. पण विद्याच्या नाही तर तिच्या दोन शेजा-यांच्या घरात डेंग्यू पसरविणाºया डासांच्या अळ्या सापडल्या. या शेजा-यांमध्ये एक घर दुसरे तिसरे कुणाचे नसून अभिनेता शाहीद कपूरचे आहे.  विद्या बालन ही जुहूतारा रोडवरील प्रणिती इमारतीत राहते. तिच्या घराची तपासणी केली तेव्हा अधिका-यांना तिथे डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या नाहीत. पण, विद्या बालनच्या घराच्या वरती चौथ्या मजल्यावर राहणाºया मीरा पटेल यांच्या घरात दोन ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्या. तर, याच इमारतीत शाहीद कपूरचे घर आहे. त्याच्या खासगी तरणतलावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यानंतर तत्काळ या अळ्या मारण्यात आल्या. या दोन्ही घरांवर महापालिकेच्या अधिनियम ३८१ बी नुसार कारवाई करण्यात आली आहे. यांना नोटीस पाठवण्यात आली असून यांना २ ते १० हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
 
Web Title: Shaheed responsible for dengue for education ??
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.