आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा काल दिवसभर शाहरूख खानच्या अलिबागच्या फार्महाऊसवर होते. या फार्महाऊसवर रंगलेल्या शाहरूखच्या वाढदिवसाच्या ग्रॅण्ड पार्टीला सिद्धार्थ व आलिया हजर होते. एका खासगी हेलिकॉप्टरने करण जोहर, फराह खान,आलिया व सिद्धार्थ असे चौघे अलिबागला पोहोचले होते. साहजिक आलिया व सिद्धार्थच्या एकत्र येण्याची ‘हेडलाईन’ झाली.( गेल्या काही दिवसांपासून आलिया व सिद्धार्थच्या ब्रेकअपची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगतेय. त्यामुळे आलिया व सिद्धार्थ एकत्र आले म्हटल्यावर त्याची ‘हेडलाईन’ होणे तसे साहजिक होते. ) केवळ एकत्र येण्याचीच नाही तर आलिया व सिद्धार्थच्या कपड्यांचीही ‘हेडलाईन’ झाली. होय, अलिबागमध्ये आलिया व सिद्धार्थने कपडे एक्सचेंज केलेत, अशी चर्चा यादरम्यान रंगली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण चर्चा तशीच होती. तसे पुरावेही होते.होय, शाहरूखच्या बर्थ डे बॅशसाठी रवाना होताना सिद्धार्थने निळ्या रंगाच्या लाईन्स असलेला टी-शर्ट घातला होता. सिद्धार्थ या कूल टी-शर्टमध्ये चांगलाच हॅण्डसम दिसत होता. पण शाहरूखच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून परतताना सिद्धार्थचा हाच निळ्या लाईन्स असलेला टी-शर्ट आलियाच्या अंगावर होता. होय, अलिबागवरून मुंबईत परतताना आलियाने सिद्धार्थने सकाळी घातलेला अगदी सेम टू सेम ब्ल्यू अ‍ॅण्ड व्हाईट स्ट्राईप्ड टी-शर्ट आणि त्यावर ब्लू डेनिम जॅकेट कॅरी केले होते. 

परतीच्यावेळी सिद्धार्थ तिच्यासोबत नव्हता. पण कदाचित त्याचे टी-शर्ट आलियासोबत होते. आता आलिया व सिद्धार्थचा हा सेम टू सेम टी-शर्ट ‘इत्तेफाक’ होता की, आणखी काही  हे त्या दोघांनाच ठाऊक़ पण ‘इत्तेफाक’ नसेल तर यातून एक वेगळा मॅसेज मात्र मिळतोय. तो म्हणजे,  ब्रेकअपच्या बातम्या थांबवण्याचा. तुम्हाला काय वाटते, ते जरूर कळवा.

ALSO READ: पापा शाहरुख खानच्या वाढदिवशी वैतागला अबराम !

आज शुक्रवारी सिद्धार्थचा ‘इत्तेफाक’ रिलीज झाला. या चित्रपटात सिद्धार्थच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे.   ‘इत्तेफाक’ हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’चा आॅफिशिअल रिमेक आहे. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. 
Web Title: Shah Rukh's Birthday Party appeared on the Aajab 'Ittefaq'! Siddharth Malhotra's T-shirt Alia Bhatt!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.