Shah Rukh Khan wanted the role of Akshaye Khanna! But it was time to get angry! | ​शाहरूख खानला हवी होती अक्षय खन्नाची भूमिका! पण ऐनवेळी झाला घोळ!!

सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्ना आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘इत्तेफाक’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सिद्धार्थ, अक्षय व सोनाक्षीच्या या चित्रपटाशी किंगखान शाहरूख खानचे एक खास कनेक्शन आहे.  कुठले तर शाहरूख या चित्रपटाचा को-प्रोड्यूसर आहे. होय, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आणि शाहरूख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शनने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. त्यामुळे ‘इत्तेफाक’च्या प्रमोशनमध्ये शाहरूख हिरहिरीने भाग घेताना दिसतोय. (शेवटी लावलेला पैसा वसूल तर व्हायलाच हवा ना.)
काल-परवा ‘इत्तेफाक’ची प्रमोशनल प्रेस कॉन्फरन्स झाली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये शाहरूख भरभरून बोलला. ‘इत्तेफाक’मध्ये काम करण्याची शाहरूखची मनापासून इच्छा होती. या चित्रपटात अक्षय खन्ना साकारत असलेल्या भूमिकेवर शाहरूखचा जीव आला होता. चित्रपटाची कथा आणि त्यातला अक्षयचा रोल त्याला इतका आवडला होता की, त्याला ही भूमिका करायची होती. पण डेट्सची अडचण आली आणि शाहरूखला ही भूमिका सोडावी लागली. याबद्दल शाहरूखने सांगितले की, मला चांगली कथा आणि स्क्रिप्टची फार जाण नाही. पण मी ‘इत्तेफाक’ची कथा ऐकली तेव्हाच दमदार कथा आहे, हे मला जाणवले होते. मला यात अक्षयची भूमिका प्रचंड आवडली होती. पण मी आधीच तीन सिनेमे साईन केले होते. त्यामुळे माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे मी शांत बसलो. पण या भूमिकेसाठी अक्षय खन्नाची निवड झाली तेव्हा या भूमिकेसाठी तोच माझ्यापेक्षा बेस्ट आहे, हे मला कळून चुकले. ओरिजनल ‘इत्तेफाक’ कसा बनला, याची सगळी कथा मला यश चोप्रा यांनी ऐकवली होती. यश चोप्रा एक नाटक पाहायला गेले होते. ते नाटक पाहून आलेत आणि त्यावर चित्रपट बनवायचा हे त्यांनी ठरवून टाकले. यश चोप्रांचा हाच चित्रपट नव्या पिढीसाठी एका नव्या ढंगात आम्ही घेऊन आलो आहोत, असे शाहरूखने यावेळी सांगितले.

ALSO READ: WATCH : ​जबरदस्त सस्पेन्स अन् थ्रील! ‘इत्तेफाक’चा ट्रेलर आला!

 ‘इत्तेफाक’हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’चा आॅफिशिअल रिमेक आहे. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. अभय चोप्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. आधी या रिमेकचे नाव ‘इट हॅपन्ड वन नाईट’ असे होते. पण नंतर या चित्रपटाला ‘इत्तेफाक’ हेच नाव देण्याचे ठरले. 
Web Title: Shah Rukh Khan wanted the role of Akshaye Khanna! But it was time to get angry!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.