Shah Rukh Khan is planning a fourth child at the age of 52, aspiration for the name! | वयाच्या ५२व्या वर्षी शाहरूख खान करतोय चौथ्या अपत्याचे प्लॅनिंग, नाव ठेवणार आकांक्षा!

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आपल्या प्रोफेशनल लाइफबरोबरच पर्सनल लाइफविषयीदेखील चर्चेत असतो. बºयाचदा त्याच्या आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान या तिन्ही मुलांबरोबर बघण्यात आले आहे. मात्र त्याचे सर्वात जास्त फोटो लहानग्या अबरामबरोबर व्हायरल झाले आहेत. शाहरूख त्याच्या तिन्ही मुलांवर प्रचंड प्रेम करतो. तो तिन्ही मुलांबरोबर एक वडील म्हणून राहण्यापेक्षा एक मित्र म्हणून वावरणे अधिक पसंत करतो. त्यामुळे बºयाच ठिकाणी त्याची मुलांसोबतची बॉण्डिंग बघावयास मिळाली आहे. असो, आज आम्ही शाहरूखबद्दल आणखी एक बातमी सांगणार आहोत. 

त्याचे झाले असे की, शाहरूख ‘टीईडी टॉक्स इंडिया : नई सोच’च्या एका एपिसोडची शूटिंग करीत होता. शोदरम्यान त्याला ‘आकांक्षा’ हा शब्द उच्चारायचा होता. परंतु त्याच्याकडून या शब्दाचा स्पष्ट उच्चार होत नव्हता. त्यासाठी त्याला बरेचसे रिटेकही घ्यावे लागले. ज्यानंतर शाहरूखने चेष्टामस्करीत म्हटले की, ‘मला हे नाव उच्चारताना बरेचसे रिटेक घ्यावे लागले. हे खरोखरच लाजिरवाणे आहे. मला असे वाटते की, लवकरच चौथ्या अपत्याची प्लानिंग करायला हवी. जिचे नाव मी ‘आकांक्षा’ ठेवणार आहे. ‘टीईडी टॉक्स इंडिया : नई सोच’ या शोमध्ये शाहरूख लोकांना त्यांच्या आयडिया शेअर करण्याचा सल्ला देत असतो. हा शो सोशल कॉजशी संबंधित आहे. सध्या शाहरूख त्याच्या आगामी ‘झीरो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 
Web Title: Shah Rukh Khan is planning a fourth child at the age of 52, aspiration for the name!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.