shah rukh khan in dubai to promote film zero | शाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ!!
शाहरुख खानवर भारी पडलेत सलमान खानचे फॅन्स, पाहा व्हिडिओ!!

ठळक मुद्देआनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

शाहरुख खान सध्या ‘झिरो’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच दुबईत या चित्रपटाचा  प्रमोशन इव्हेंट झाला. या इव्हेंटमध्ये शाहरुख धम्माल मस्ती करताना दिसला. ‘छईयां छईयां’ आणि ‘तुझे देखा तो यह जाना सनम’ गाण्यांवर धम्माल डान्स करत दुबईतील चाहत्यांचे मनोरंजन करण्यात शाहरूखने कुठलीही कसर सोडली नाही. पण   तरिही दुबईतील चाहत्यांना शाहरूख सोडून सलमान खान आठवला. होय,  दुबईतील या इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.  यातील एका व्हिडिओत चाहते, शाहरूखसमोर सलमान...सलमान...म्हणून ओरडताना दिसले. चाहत्यांना सलमान...सलमान...ओरडताना पाहून बिच्चारा शाहरूख काय करणार? अखेर त्यानेही आपल्यासमोर बसलेले लोक आपले कमी अन् सलमानचे मोठे चाहते असल्याचे मान्य केले अन् ‘सलमान की तरफ से सलाम आप लोंगो को’ म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला.शाहरूखचा हा मनाचा मोठेपणा पाहून सलमानच्या चाहत्यांना आणखीच स्फुरण चढले. त्यांनी आणखी मोठा जल्लोष केला.


या इव्हेंटचा एक व्हिडिओ शाहरुखनेही आपल्या सोशल अकाऊंटवर  शेअर केला आहे. ‘आज दुबई में गाना सही बैठ रहा है...सबका प्यार देखकर लगा, सच्ची में प्यार दीवाना होता है,’ असे हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुखने लिहिले आहे.


आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अनुष्का, कॅटरिना व शाहरूख यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात पाहायला मिळणार आहे. एकं हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

English summary :
Zero Movie: Shahrukh Khan is currently busy in promotion of his upcoming film 'Zero'. The promotion event of the film was recently done in Dubai where he greeted salman khan's fan.


Web Title: shah rukh khan in dubai to promote film zero
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.