लिहिण्यापूर्वी दोनदा विचार करा! आयटम सॉन्ग लिहिणाऱ्यांना शबाना आझमींचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 10:16 AM2018-08-08T10:16:21+5:302018-08-08T10:17:16+5:30

शबाना यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या आपल्या करिअरमध्ये १३० हून अधिक व्यावसायिक व समांतर चित्रपटांत त्या दिसल्या.

shabana azmi attacks on item song lyricist | लिहिण्यापूर्वी दोनदा विचार करा! आयटम सॉन्ग लिहिणाऱ्यांना शबाना आझमींचा सल्ला!

लिहिण्यापूर्वी दोनदा विचार करा! आयटम सॉन्ग लिहिणाऱ्यांना शबाना आझमींचा सल्ला!

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी अनेकदा बॉलिवूडमधील आयटम सॉन्गबद्दलची जाहिर नाराजी बोलून दाखवली आहे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये त्या या मुद्यावर पुन्हा बोलल्या. त्यांनी थेट आयटम सॉन्ग व तत्सम गाणी लिहिणा-या गीतकारांनावर हल्ला चढवला. अशी गाणी लिहिण्याआधी गीतकारांनी दोनदा विचार करा, असे त्या म्हणाल्या.
चित्रपटांतील आयटम सॉन्गच्या वापराला माझा तीव्र विरोध आहे. या गाण्यांमधले शब्द आक्षेपार्ह तर असतातच. पण ते महिलांचा अपमान करणारेही असतात, असे शबाना म्हणाल्या. यासाठी त्यांनी ‘दबंग2’मधील ‘फेविकोल से’ या गाण्याचा उदाहरणादाखल उल्लेख केला. चित्रपटात अशा गाण्याची मला अजिबात गरज वाटत नाही. अशी गाणी कुठल्याही कथानकाचा भाग असूच शकत नाहीत. चित्रपटाच्या कथेशी त्यांचा काहीही संबंध नसतो. गीतकारांनी अशी गाणी लिहिण्याआधी दोनदा विचार करायला हवा, असे त्या म्हणाल्या.
तथापि अलीकडच्या महिलाप्रधान चित्रपटांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अलीकडच्या चित्रपटांत महिलांना अधिक भक्कम, सक्षम दाखवले जात आहे, ही समाधानाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

शबाना यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या आपल्या करिअरमध्ये १३० हून अधिक व्यावसायिक व समांतर चित्रपटांत त्या दिसल्या. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतही त्यांनी भूमिका वठवल्या. 
 ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’, ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का; आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी आॅफ जॉय; या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची पत्नी असलेल्या शबाना आझमी अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील सक्रिय असतात. 

Web Title: shabana azmi attacks on item song lyricist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.