ठळक मुद्देप्रियांका चोप्रा ‘एशिअन सेक्सिएस्ट वूमन’च्या  यादीत  दुस-या क्रमांकावर आहे. गतवर्षी या यादीत ती पहिल्या क्रमांकावर होती. पण यावर्षी प्रियांकाला पछाडत दीपिकाने पहिला क्रमांक पटकावला.

दीपिका पादुकोणप्रियांका चोप्रा या दोघीही लग्नामुळे चर्चेत आहेत. पण याचदरम्यान एक मोठी बातमी आली आहे आणि लग्नानंतरही दीपिका पादुकोणचा ‘जलवा’ कमी झालेला नाही, हे या बातमीने सिद्ध केले आहे. होय, आशियाच्या ५० मोस्ट सेक्सिएस्ट महिलांच्या यादीत दीपिकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. म्हणजे, दीपिका  मोस्ट एशियन सेक्सिएस्ट महिला ठरली आहे.  ब्रिटेनच्या ‘इस्टर्न आय’ या वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी ‘एशिअन सेक्सिएस्ट वूमन’साठी दीपिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे.

 

गत १४ व १५ नोव्हेंबरला दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांचेही लग्न झाले. लग्नानंतर लगेच दीपिका ‘एशिअन सेक्सिएस्ट वूमन’च्या किताबावर आपले नाव कोरले.


गत १ व २ डिसेंबरला अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकलेली प्रियांका चोप्रा ‘एशिअन सेक्सिएस्ट वूमन’च्या  यादीत  दुस-या क्रमांकावर आहे. गतवर्षी या यादीत ती पहिल्या क्रमांकावर होती. पण यावर्षी प्रियांकाला पछाडत दीपिकाने पहिला क्रमांक पटकावला.


दीपिका व प्रियांकाशिवाय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिने यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. गतवर्षी निया या यादीत दुस-या क्रमांकावर होती. यंदा ती तिस-या क्रमांकावर पोहोचली. 

दीपिका, प्रियांका व निया शर्मापाठोपाठ पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

तर टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी हिने पाचवे स्थान पटकावले आहे. शिवांगी जोशी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नायराच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेने शिवांगीला लोकप्रीयतेच्या शिखरावर पोहोचवले आहे.


Web Title: Sexiest Asian Woman: Deepika Padukone dethrones Priyanka Chopra as the 'Sexiest Asian Woman of 2018' on a UK poll
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.