Sex and Thunder ...! See; Ragini MMS Returns Trailer !! | ​सेक्स अन् थरार...! पाहा; ‘रागिनी एमएमएस रिटर्न’चा ट्रेलर!!

एकता कपूर प्रॉडक्शनची नवी वेबसीरिज ‘रागिनी एमएमएस रिटर्न’चा ट्रेलर आज आऊट झाला. या ट्रेलरमध्ये रिया सेनची झलक नाही. पण अभिनेत्री करिश्मा शर्मा अतिशय बोल्ड अंदाजात यात दिसतेय. २०११ मध्ये आलेल्या ‘रागिनी एमएमएस’ हा चित्रपट आला. यात राजकुमार रावने जबरदस्त अभिनय केला होता. यानंतर २०१४ मध्ये ‘रागिनी एमएमएस2’ आला. यात सनी लिओनी बोल्ड अवतारात दिसली. या दोन्ही चित्रपटातील काही दृश्यांनी ‘रागिनी एमएमएस रिटर्न’च्या ट्रेलरची सुरूवात होते आणि मग अंगावर काटा आणणारे काही दृश्य तुमच्यासमोर येतात.हा ट्रेलर पाहिल्यानंतर ही बेवसीरिज दोन कॉलेज गर्ल्सची कहानी असल्याचे कळते. दोघीही एका होस्टेलमध्ये राहतात. याच होस्टेलमध्ये एक म्हातारी चेटकीण असते आणि होस्टेलच्या मुलींना त्रास देतांना दिसते. एकता कपूरच्या चित्रपटांत दिसतो तसा सगळा मसाला या ट्रेलरमध्ये दिसतो.  सेक्स आणि थरार यात अगदी भरभरून दिसतेय.

ALSO READ : LEAKED!! Ragini MMS Returnsमधील रिया सेनचा हॉट लवमेकिंग व्हिडिओ viral!

यात करिश्मा शर्मा रागिणीची भूमिका साकारते आहे तर रिया सेन सिमरनच्या व्यक्तिरेखेत आहे. दोघीही या वेबसीरिजमध्ये अतिशय बोल्ड भूमिकेत दिसणार आहेत. कालच या वेबसीरिजमधील रियाचा एक लव्ह इंटिमेट सीन लीक झाला होता. मध्यंतरी याच वेबसीरिजच्या सेटवर रियाने अशाच एक बोल्ड सीनचे शूटींग सुरु असताना धम्माल उडवून दिली होती.  रियाला को-स्टार निशांत मलकानीसोबत एक लव्ह मेकिंग सीन द्यायचा होता.  दिग्दर्शक सुयश वाढवकरने रियाला अधिकाधिक एक्सपोज करायला सांगितले. पण रियाला हे मान्य नव्हते. नेहमी अभिनेत्रीनेच एक्सपोज का करायचे, असे तिचे म्हणणे होते. तिने दिग्दर्शकाला हे समजवण्याचा प्रयत्न केला. पण दिग्दर्शक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मग काय, रियाने लव्ह मेकिंग सीन देताना निशांतला बेडवर आडवे केले अन  क्षणात त्याची पॅन्ट एका  खाली खेचली.  रियाच्या या वागण्याने निशांतची चांगलीच भंबेरी उडाली आणि तिकडे रिया  हसत सुटली होती. रियाने एका मुलाखतीत हा सगळा किस्सा सांगितला होता. 

Web Title: Sex and Thunder ...! See; Ragini MMS Returns Trailer !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.