बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान हल्ली तिच्या फोटोंवरून चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच स्विमिंग करतानाचा तिने एक फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा तिने असाच काहीसा फोटो शेअर करून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे. वास्तविक सुहानाने एक सेल्फी तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केला असून, त्यामध्ये ती पाउट बनविताना दिसत आहे. सुहानाने हा सेल्फी शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून यास मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. वास्तविक शाहरूखची लाडकी लेक सुहाना सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा स्विमसूट फोटो पोस्ट केला होता. फोटोमध्ये ती एखाद्या प्रोफेशनल मॉडेलप्रमाणे पोझ देताना दिसत होती. आता तिने एक सेल्फी पोट केला असून, त्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीबरोबर दिसत आहे. फोटोमध्ये सुहाना ‘उबेर चिक’ स्टाइलमध्ये बघावयास मिळत आहे. १७ वर्षीय सुहानाने दोन पिग टेल्स बनविले आहेत. शिवाय सेल्फी क्लिक करताना तिने पाउट फेसदेखील बनविला आहे. 

सुहाना नेहमीसारखीच गॉर्जियस लूकमध्ये बघावयास मिळत आहे. सुहानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर शाहरूखची ही लाडकी लेक कोणत्याही बॉलिवूड दिवापेक्षा कमी नाही. ती कुठल्याही सोशल इव्हेंट किंवा मुव्ही स्क्रिनिंगला स्पॉट झाली की, तिच्या स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्सची एकच चर्चा रंगते. असो, सुहाना सध्या लंडन येथे तिचे शिक्षण पूर्ण करीत आहे. त्यामुळे तिची बॉलिवूडमध्ये येण्याची सध्या तरी कुठलीही चर्चा नाही. 
Web Title: Selfie shared with Shah Rukh Khan's Lucky Lechki; Suhaan Khan looks like making pout!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.