नव्वदच्या दशकात आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी कबीर बेदी यांची लेक  अभिनेत्री पूजा बेदी रसिकांना आठवत असेलच. मोजक्या सिनेमात काम करुनही पूजा बेदी तिच्या अदा आणि हॉट अंदाजामुळे रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. आता पूजा बेदीप्रमाणेच तिच्या लेकीच्या हॉट अदांचीही चर्चा सुरु झाली आहे. पूजापेक्षा आता तिच्या लेकीची म्हणजेच आलिया जोरदार चर्चा रंगते आहे. सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो आलियाने शेअर केले आहेत.
 

यांत आलियाचा हॉट लूक पाहायला मिळत आहे. तिच्या मादक अदा पाहून कुणीही क्लीन बोल्ड होईल. आलिया सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.
 

मित्रांसोबत मजा-मस्ती पार्टीचे फोटो आणि बिकीनी फोटोसुद्धा कायम ती पोस्ट करत असते. 2011 साली सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या एका रियालिटी शोमध्येही ती झळकली होती. या शोमध्ये स्पर्धक म्हणून आई पूजा बेदीसह आलियाला रसिकांनी पाहिलं होतं. तेव्हापासूनच आलियाच्या मादक आणि हॉट अंदावर रसिक फिदा झालेत. तिचे ते फोटो पाहून अनेकांनी तिला बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच की काय आलिया बॉलिवूडमध्ये एंट्री मारणार का याकडं नजरा लागल्या आहेत. विषकन्या सिनेमातून बी-टाऊनमध्ये एंट्री मारलेल्या पूजा बेदीनं जो जीता वहीं सिकंदर या सिनेमातून आपल्या अदांनी रसिकांना घायाळ केलं  होतं. आता त्याच पूजा बेदीची लेकही रुपेरी पडदा आपल्या मादक अदांनी गाजवते का हे पाहणं रंजक ठरणार आहे.
 

न्यूयॉर्कमध्ये राहणारी आलिया सध्या फॅशन क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 2014 सालीसुद्धा आलिया बेदी चर्चेत आली होती. पूजा बेदीची लेक असणारी आलिया आणि रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडण झालं होतं. यानंतर पूजानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. दुस-या बाजूला साक्षीच्या आई मीनाक्षी सागर यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पॉस्को कायद्यानुसार पूजा बेदीला अटकही झाली होती. 
 
 
Web Title: By seeing this photo of 'Aaliya' you will also say OMG, but it is not 'Bhat', who is it?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.