Seeing 61-year-old Anil Kapoor, you will be surprised to know the reactions of Shahid Kapoor's wife! | ६१ वर्षीय अनिल कपूरला बघून शाहिद कपूरच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

ईदनिमित्त प्रदर्शित झालेल्या ‘रेस-३’मध्ये सलमान खाननंतर सर्वांत महत्त्वाची भूमिका अभिनेता अनिल कपूर साकारत आहे. चित्रपटात तो शमशेराच्या भूमिकेत आहे. चित्रपटाला भलेही समीक्षक आणि प्रेक्षकांकडून पहिल्या दिवशी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, अनिल कपूरच्या भूमिकेचे मात्र सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ६१ वर्षीय अनिलचा लूक्स आणि अभिनय बघून जावाई आनंद आहुजादेखील त्याचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे. त्याने सोशल मीडियावर अनिलचा फोटो शेअर करून लिहिले की, ‘Old enough to know better, young enough to not give a f* ! @anilskapoor #RACE3’

वास्तविक आनंदने या अगोदरही इन्स्टाग्रामवर अनिल कपूरचे कौतुक केले आहे. त्यासाठी त्याने पोस्ट शेअर केल्या होत्या. केवळ आनंदच नाही तर शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनेही अनिलवर कौतुकाचा वर्षाव केला. ‘रेस-३’ बघितल्यानंतर मीराने अनिल कपूरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना, ‘This (fire emoji) at 60! How!!’ असे लिहिले. सोनमनेदेखील आपल्या वडिलांचे कौतुक करताना, ‘So intense Daddy! Loving the look & feel of #Race3 already! Can’t wait to watch it।’ ही पोस्ट शेअर केली. 

दरम्यान, वयाच्या ६१व्या वर्षीय अनिल कपूरमधील जोश बघण्यासारखा आहे. जेव्हा तो बॉलिवूडमध्ये आला तेव्हा जसा अनिल प्रेक्षकांना बघावयास मिळायचा तसाच अनिल आजही प्रेक्षकांना बघावयास मिळतो. खरं तर अनिल कपूरच्या वयाचा अंदाज लावणेही प्रेक्षकांना अवघड होत आहे. शिवाय त्याच्या अभिनयातील परिपक्वताही कमालीची असून, तरुण पिढीचाही त्याच्या फॅन लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 
Web Title: Seeing 61-year-old Anil Kapoor, you will be surprised to know the reactions of Shahid Kapoor's wife!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.