पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत देशभरातील विवाहितांनी काल रविवारी  ‘करवा चौथ’चा सण उत्साहात साजरा केला. बॉलिवूड सेलिब्रिटीही या उत्साहात आनंदाने सहभागी होताना दिसले. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’चे व्रत ठेवले आणि संध्याकाळी चंद्र आणि पतीदेवाच्या दर्शनाने आपल्या व्रताची सांगता केली. खरे तर अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘करवा चौथ’ची पूजा होते. पण अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर यांच्या घरातील ‘करवा चौथ’चे सेलिब्रेशन दरवर्षी खास असते. यंदाही सुनीता यांच्या घरी ‘करवा चौथ’ साजरा केला गेला. रविवारी संध्याकाळी श्रीदेवी, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, नीलम कोठारी, संजय कपूरची पत्नी महीप संधू, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आदिंनी अनिल कपूर व सुनीता कपूर यांच्या घरी ‘करवा चौथ’ची पूजा केली. वरूण धवनची आई करूणा धवन आणि वहिणी जान्हवी धवन या सुद्धा यावेळी दिसल्या.या सगळ्या सेलिब्रेशनचे फोटो सेलेब्सने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोत सर्व लेडिज अनिल कपूर, संजय कपूर व शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यासोबत दिसत आहेत. सगळ्या जणी पारंपरिक लूकमध्ये आहेत. वरूण धवनची वहिनी आणि दिग्दर्शक रोहित धवनची पत्नी जान्हवी लाईट पिंक कलरच्या सूटमध्ये दिसते आहे. श्रीदेवी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर दिसतेय. क्रिम कलरची साडी आणि त्याला पीच कलची बॉर्डर शिवाय मॅचिंग ज्वेलरी यात श्रीदेवीचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

‘करवा चौथ’च्या पूजेदरम्यान शिल्पा शेट्टीने राजस्थानी स्टाईलची साडी नेसलेली आहे. पती राज कुंद्रा याला पाहून शिल्पाने जलग्रहण केले आणि आपल्या व्रताची सांगता केली.

'
विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथचा व्रत करतात. कार्तिक महिन्याच्या चौथ्या दिवशी करवा चौथ साजरी केली जाते. पतीला दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी आजच्या दिवशी पत्नी निर्जळी उपवास करतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर पती आणि चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो. 
Web Title: See special photo! Sridevi, Shilpa Shetty, Sunita Kapoor, Raveena Tandon celebrated 'Karva Chauth' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.