काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात टायगर श्रॉफची अभिनेत्री म्हणून निधी अग्रवाल झळकली होती. चित्रपटातील निधीचा ग्लॅमर अंदाज सगळ्यांनाच भावला. निधीचे सौंदर्य कौतुक करणारे अन् प्रेमात पाडणारे आहे. अशातही जेव्हा निधी एका पार्टीत उपस्थित राहिली तेव्हा तिच्यासोबत असलेल्या टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिचाच अधिक बोलबाला राहिला. कदाचित तुम्हाला ही बाब पटणार नाही, परंतु लाइमलाइटपासून दूर राहणारी कृष्णा जेव्हा निधीसोबत पार्टीत आली तेव्हा सर्वांचाच नजरा तिच्यावर खिळल्या. 

कृष्णा आणि निधी रोहिणी अय्यरच्या बर्थ डे पार्टीत गेल्या होत्या. रोहिणी अय्यर रेनड्रॉप मीडियाची मालकीण आहे. या कंपनीच्या माध्यमातून मीडिया मॅनेजमेंटचे काम केले जाते. रोहिणीच्या बर्थ डेसाठी जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा आणि बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल एकत्र उपस्थित राहिल्या. लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहणारी कृष्णा यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बघावयास मिळाली. तिचा लूक एवढा हॉट दिसत होता की, तिच्यासमोर निधीचे सौंदर्य फिके पडले. 

खरं तर ‘मुन्ना मायकल’ची अभिनेत्री असलेली निधीही सुंदर दिसत होती. परंतु सर्वत्र चर्चा कृष्णाचीच होती. वास्तविक कृष्णा आणि निधी दोघीही सोशल मीडिया सेन्सेशन आहेत. इन्स्टाग्रामवर दोघींच्या फॉलोअर्सची संख्या लाखात आहे. दोघीही अधूनमधून त्यांचे हॉट फोटो शेअर करीत असतात. इन्स्टावरील निधीच्या फॉलोअर्सची संख्या ४४८,००० इतकी आहे. तर कृष्णाच्या फॉलोअर्सची संख्या २९१,००० इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगत आहे. 
Web Title: SEE PICS: Tiger's sister, Krishna Shroff, despite being a Nidhi Agarwal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.