सारा अली खान हिने भलेही बॉलिवूडमध्ये अद्यापपर्यंत डेब्यू केला नसला तरी, तिची फॅन फॉलोइंग कमालीची आहे. जेव्हा जेव्हा ती मीडियाच्या कॅमेºयात कैद होते, तेव्हा तेव्हा तिचे हे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावेळेस पुन्हा एकदा मीडियाच्या कॅमेºयात सारा कैद झाली आहे. बांद्रा येथे स्पॉट झालेली सारा आई अमृता सिंगसोबत बघावयास मिळाली. अतिशय सिम्पल लूकमध्ये असलेली सारा खूपच सुंदर दिसत होती. या लूकमधील साराच्या अदा घायाळ करणाºया होत्या. जेव्हा तिला मीडियाचे कॅमेरे दिसले तेव्हा मात्र तिने चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी सारा फॅशन शोमध्ये बघावयास मिळाली होती. कॅज्युअल लूकमध्ये असलेल्या साराने सगळ्यांचेच लक्ष आकर्षित केले होते. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. परंतु सगळ्यांच्याच नजरा सारावर खिळल्या होत्या. दरम्यान, आता स्पॉट झालेली सारा अगदीच सिम्पल लूकमध्ये होती. फ्लोरल कुर्ता आणि नेहमीप्रमाणे मोकळे केस असलेली सारा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. साराने अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नसले तरी, तिने अभिषेक कपूर यांचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट साइन केला आहे. चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर बघावयास मिळणार आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट असल्याने त्यासाठी ती खूपच एक्साइटेड आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये बघावयास मिळणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न अशाप्रकारची आहे. सध्या सारा तिच्या डेब्यूसाठी भरपूर प्रिपरेशन करीत आहे. या चित्रपटाला एकता कपूर प्रोड्यूस करीत आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही बघावयास मिळणार आहे. सध्या सुशांत त्याच्या ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान ‘केदारनाथ’ एक लव्हस्टोरी असून, २०१३ मध्ये झालेल्या घटनेवर काही प्रमाणात आधारित आहे. साराच्या डेब्यूमुळे सुशांत खूपच उत्साहित असून, तिच्यासोबत काम करणे मजेशीर ठरेल, असे त्याने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. 
Web Title: See Pics: Simple Look, Sarah Ali Khan looks so beautiful!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.