श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर एक पॉप्युलर स्टार किड आहे, यात कुठलेही दुमत नाही. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच जान्हवी स्टार झाली आहे. जान्हवीला साधी शिंक आली तरी, ती सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागते. मित्रासोबतचे आऊटींग असो, मम्मासोबतचा ग्लॅमरस लूक असो किंवा बॉलिवूडची पार्टी असो, जान्हवी जिथे दिसेल, जिथे जाईल, त्याची अलीकडे बातमी व्हायला लागली आहे. आता तर जान्हवीचा डेब्यू सिनेमा ‘धडक’ही येतोय़ नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि तो पाहून लोक जान्हवीच्या प्रेमात पडलेत. दीर्घकाळापासून जान्हवी बॉलिवूड डेब्यूसाठी तयारी करत होती.आई श्रीदेवी हयात असताना त्यांनीही जान्हवीला बॉलिवूडसाठी तयार करण्यात कुठलीही कसूर सोडली नव्हती. होय, अगदी तिचे लूक बदलण्यापासून तर तिच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपर्यंत सगळ्याबाबतीत श्रीदेवी सजग होत्या. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत जान्हवी कमालीची बदललीयं.

तिचे जुने फोटो आणि आत्ताचे फोटो यात सगळेच आले. हे फोटो पाहता हीच ती जान्हवी का, अशी शंका येते.
बॉलिवूड डेब्यूआधी जान्हवीने नाकाची सर्जरी केल्याचे बोलले जाते.

होय, काही वर्षांआधी जान्हवीच्या नाकाचा शेप वेगळाच होता. पण आता बघाल तर तिचे  नाक बरेच स्लिम दिसतेय.  जान्हवीने खरोखरीच नोस सर्जरी केली वा नाही, याबाबत आम्ही दाव्यानिशी सांगू शकत नाही. पण तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो बघता, या बातमीवर विश्वास ठेवणे फार कठीण वाटत नाही. 

ALSO READ : ‘धडक’च्या कलाकारांनी किती घेतले मानधन? जाणून घ्यायचे तर वाचा बातमी!!

जान्हवी सध्या तिच्या पहिल्या ‘धडक’ या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टूडिओ बॅनर अंतर्गत बनविण्यात आलेला हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केले आहे. चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे. 
Web Title: SEE PICS: 'Shocked' Girl Janhavi Kapoor changed so much! I want to know about it now, see difference !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.