संजय दत्त स्टारर ‘भूमी’ या चित्रपटाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. होय, चित्रपटातील सनी लिओनीचा आयटम नंबर डान्स लीक झाला असून, त्याचा फटका चित्रपटाला बसण्याची शक्यता आहे. ‘भूमी’चे शूटिंग पूर्ण झाले असून, सध्या एडिटिंगचे काम सुरू आहे. याचदरम्यान सनीचा आयटम नंबर डान्स लीक झाल्याने गाण्यातील सनीचा हॉट अंदाज बघण्यासारखा आहे. काही दिवसांपूर्वीच ‘भूमी’मध्ये सनीचा खूपच हॉट आणि बोल्ड असा आयटम नंबर डान्स असेल अशी चर्चा होती. आता त्याचे काही फोटोज् लीक झाल्याने त्याचा अंदाज बांधणे शक्य होत आहे. ब्लॅक ड्रेसमध्ये असलेली सनी खूपच हॉट दिसत आहे. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, चित्रपटात सनी धमाका करेल. दरम्यान, सनीच्या या लीक झालेल्या आयटम नंबर डान्समुळे त्याचा फटका ‘भूमी’च्या निर्मात्यांना बसण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलरमध्ये दमदार भूमिकेत दिसत असलेला संजूबाबा जबरदस्त कमबॅक करेल, असेच काहीसे दिसत आहे. कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतर संजूबाबा ‘भूमी’मधून परतत आहे. चित्रपटात तो एका वडिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर त्याच्या मुलीच्या भूमिकेत आदिती राव हैदरी आहे. संजूबाबा ‘भूमी’च्या रिलीजनंतर लगेचच ‘मुन्नाभाई-३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर सध्या तो त्याच्या बायोपिक ‘दत्त’वरही लक्ष केंद्रित करून आहे. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. तर राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. चित्रपटाची शूटिंग पूर्णत्वास असून, लवकरच त्याच्या रिलीजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 
Web Title: SEE PICS: Sanjay Dutt's 'land number' Sunny Leone's 'item number' leaked!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.