‘दबंग3’ची घोषणा झाली अगदी तेव्हापासून याच्या स्टारकास्टबद्दल चर्चा सुरु आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा या दोघांचे नाव तर फायनल आहे. पण चर्चा खरी मानाल तर सलमानच्या या बहुप्रतिक्षीत चित्रपटातून आणखी एका स्टार किड्सची बॉलिवूड एन्ट्री होतेय. होय, पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार,अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी मांजरेकर ‘दबंग3’मधून बॉलिवूड डेब्यू करतेय.महेश मांजरेकर आणि सलमान खानची मैत्री सर्वश्रूत आहे. अलीकडे काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली, तेव्हा महेश मांजरेकरांनी  सलमानला जाहीर पाठींबा दिला होता. सलमान एक अशी व्यक्ती आहे, जी आरोप स्वत:वर घ्यायला कायम तत्पर असते. शेवटपर्यंत तो स्वत:तील माणुसकी निभवतो. चूक कोण करत नाही. मीही अनेकदा चुकलो आहे. पण सलमान चूक करतो तेव्हा त्याचा बोभाटा केला जातो. त्याच्या चूकांवर नेमके बोट ठेवले जाते. सलमान माझ्यासाठी मित्रापेक्षा खूप काही आहे, असे महेश मांजरेकर म्हणाले होते.आता इतकी मैत्री असताना आणि महेश मांजरेकरांच्या मुलीसाठी इतके तर बनतेच. विशेषत: सलमान कायम नव्या प्रतिभावंतांना संधी देण्यासाठी ओळखला जात असताना. त्यामुळेच मित्राच्या मुलीच्या डेब्यूची जबाबदारी सलमानने आपल्या खांद्यावर घेतली असेल तर त्यात काहीही नवल नाही.अश्वमी आणि सत्या ही महेश व त्यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांची मुले आहेत. महेश मांजरेकरांनी थोरली मुलगी अश्वमी हिच्या नावावरुन प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे.अश्वमी फिल्म्स प्रा. लि. हे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव असून मातीच्या चुली, शहानपण देगा देवा, शिक्षणाच्या आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या सिनेमांची निर्मिती या प्रॉडक्शन हाऊसमध्ये करण्यात आली आहे.
अश्वमीचा जन्म २९आॅगस्ट १९८८ रोजी झाला. अश्वमी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असून ती स्वत:चे फोटोज इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असते.

ALSO READ : ​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत नाही, पण सलमान चुकतो तेव्हा त्याचा बोभाटा होतो...!!

‘दबंग3’बद्दल सांगायचे तर, या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ‘रज्जो’चे पात्र साकारताना दिसेल. सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यंदा जूनपासून या चित्रपटाचे शूटींग सुरू होणे अपेक्षित आहे. 
Web Title: SEE PICS: Salman Khan wakes up friendship! 'The Marathi Superstar Girl Will Launch' Dabang3 '!!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.