SEE PICS: 'Doing a date to the actor, Neha Dhupia! Looked at lunch date !! | SEE PICS : ​‘या’ अभिनेत्याला डेट करतेय, नेहा धूपिया! लंच डेटवर दिसले एकत्र!!

‘रोडीज एक्स्ट्रीम’ची गँग लीडर आणि अभिनेत्री नेहा धूपिया प्रेमात पडलीय. होय, याचे पुरावेही आताश: समोर येऊ लागले आहे. खरे तर, २०१२ मध्ये एका मुलाखतीत नेहा धूपियाने एक धाडसी विधान केले होते. दोन अ‍ॅक्टर्स सहजीवन कसे जगू शकतात, याचेच मला आश्चर्य वाटते. मी तर कुण्या अ‍ॅक्टर्ससोबत लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे मी कुठल्याच अभिनेत्याला डेट करू शकत नाही. माझ्या परफेक्ट पार्टनरबद्दल विचाराल तर तो निश्चितपणे अ‍ॅक्टर नसणार, असे काय काय नेहा बोलली होती. अर्थात या मुलाखतीला आता उणीपुरी पाच- सहा वर्षे झाली आहेत आणि इतका काळ एखाद्याचे आचार-विचार बदलण्यास पुरेसा आहे. आता आम्ही हे इतक्या सविस्तर सांगतोय, कारण सध्या नेहा एका अभिनेत्याच्याच प्रेमात पडल्याची चर्चा आहे. होय, अभिनेता अंगद बेदी आणि नेहा एकमेकांना डेट करत असल्याची खबर आहे. गुरूवारी दोघांनाही एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट केले गेले.नेहा व अंगदने आजपर्यंत एकत्र काम केलेले नाही. पण काही कॉमन फ्रेन्ड्सच्या माध्यमातून त्यांची भेट झाल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी अंगदने ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्यासंदर्भाने नेहाचे कौतुक करत,नेहासोबतचा एक सुंदर फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला होता.   नेहाने लगेच अंगदच्या या पोस्टला उत्तर देत त्याला ‘शेर’ संबोधले होते. यावर ‘लव्ह यू...चलो इसे देखते है’ असे लिहित अंगदने नेहाला मुव्ही डेटचे निमंत्रण दिले होते. याच्या उत्तरादाखल नेहाने अंगदला ‘हार्ट’ पाठवले होते. दोघांचीही ही लपाछपी आता वेगळाच रंग दाखवू लागली आहे. साहजिकच दोघांमध्येही शिजत असलेल्या खिचडीचा खमंग वास सगळीकडे पसरणारच.

ALSO READ : नेहा धूपियाच्या साडीतील फोटोला नेटिझन्सने म्हटले ‘झेब्रा क्रॉसिंग’, पहा फोटो !

तूर्तास नेहा व अंगदने आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीही सांगिलेले नाही. पण दोघांचीही बॉन्डिंग बघता, या रिलेशनशिपवरून लवकरच पडदा उठेल, असे दिसतेय.
Web Title: SEE PICS: 'Doing a date to the actor, Neha Dhupia! Looked at lunch date !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.