आॅस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलला मेलबर्न येथे सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी अलंकृता श्रीवास्तव यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र या चित्रपटापेक्षा बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिची अधिक चर्चा रंगली. होय, जेव्हा ऐश्वर्या पांढºया शुभ्र ड्रेसमध्ये फेस्टिव्हल स्थळी पोहोचली, तेव्हा बघणारे दंग राहिले. ऐश्वर्याने मेलबर्न येथे तिरंगा फडकवून देशाचा मान उंचावला. त्याचबरोबर असा मान मिळालेली ऐश्वर्या पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. पांढºया शुभ्र जरीदार अनारकली ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. ऐश्वर्यासोबत तिची लाडकी आराध्यादेखील उपस्थित होती. मम्मी ऐश्वर्याप्रमाणेच आराध्यानेही पांढºया रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी जसा ऐश्वर्याने तिरंगा फडकविला, लगेचच आराध्याने मम्मी ऐश्वर्याबरोबर तिरंग्याला सलामी दिली. इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नची सुुरुवात भारतीय ध्वज फडकवून करण्यात आली. त्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन हिला यथोचित सन्मानित करण्यात आले. मेलबर्नमध्ये तिरंगा फडकविण्याचा मान मिळालेली ऐश्वर्या पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. यावेळी तिने उपस्थितांसमोर भाषणही दिले. ऐश्वर्याने म्हटले की, ‘स्वातंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, मी आयोजकांचे मनापासून आभार मानते की, त्यांनी मला ही संधी देऊन माझा सन्मान केला. हा क्षण मला आयुष्यभर स्मरणात राहील. या फिल्म फेस्टिव्हलसाठी अभिनेते अनुपम खेर, करण जोहर यांसारखे बडे स्टार्स पोहोचले आहेत. दरम्यान, ‘ऐश्वर्याने जेव्हा तिरंगा फडकविला तेव्हा सर्व भारतीयांची मान उंचावली’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. याबाबतचे ऐश्वर्या आणि आराध्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटिझन्सकडून ऐश्वर्याचे कौतुक केले जात आहे. 

Web Title: SEE PICS: Aishwarya Rai Bachchan dressed in Australia!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.