SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 10:36 AM2018-11-26T10:36:03+5:302018-11-26T10:37:33+5:30

आमिरने कॉमिक बुक सीरिजमधरल आॅब्लिक्स या कार्टून पात्राचे लूक धारण केले तर किरणने गेटाफिक्सचे लूक.

SEE PICS: Aamir Khan and Kiran Rao turn into cartoon characters for son Azad's | SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!!

SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!!

googlenewsNext
ठळक मुद्दे2002 मध्ये आमिरने रीनाला घटस्फोट दिला आणि 2005 मध्ये आमिरने किरणसोबत दुसरा संसार थाटला. अलीकडे आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ रिलीज झाला. या चित्रपटात आमिर व अमिताभ बच्चन प्रथम एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल करेल, असे वाटत असताना प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली.

सुपरस्टार आमिर खान जे काही करतो ते अगदी परफेक्ट करतो. मग स्वत:ला एखाद्या भूमिकेत वा व्यक्तिरेखेत अक्षरश: झोकून देणे असो वा चित्रपट बनवणे असो. अलीकडे आमिरने आपल्या मुलासोबत म्हणजे चिमुकल्या आझादसोबत पिकनिक साजरी केली. यातही आमिरने परफेक्शन दाखवले. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव दोघांनीही या पिकनिकसाठी कार्टून लूक धारण केला.


आमिरने कॉमिक बुक सीरिजमधरल आॅब्लिक्स या कार्टून पात्राचे लूक धारण केले तर किरणने गेटाफिक्सचे लूक. या पिकनिकमध्ये आझादशिवाय त्याचे अनेक मित्र सामील झालेत. यावेळी सगळ्यांनीच धम्माल मस्ती केली. आमिरने आपल्या डॉगीलाही यात सहभागी करून घेतले.

 


सन 2002 मध्ये ‘लगान’च्या शूटदरम्यान आमिर व किरण पहिल्यांदा एकमेकांना भेटले. आमिर विवाहीत होता पण किरणची हुशारी पाहून तो तिच्यावर कमालीचा भाळला. या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. पुढे किरणही आमिरच्या प्रेमात पडली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

2002 मध्ये आमिरने रीनाला घटस्फोट दिला आणि 2005 मध्ये आमिरने किरणसोबत दुसरा संसार थाटला. आझाद हा आमिर व किरण रावचे पहिले अपत्य आहे. पहिल्या पत्नीपासून आमिरला एक मुलगा व एक मुलगी असे दोन मुले आहेत.
अलीकडे आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ रिलीज झाला. या चित्रपटात आमिर व अमिताभ बच्चन प्रथम एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल करेल, असे वाटत असताना प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे पाठ फिरवली. ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’नंतर आमिरने अद्याप कुठल्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. तूर्तास तरी आमिर आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसतोय.

Web Title: SEE PICS: Aamir Khan and Kiran Rao turn into cartoon characters for son Azad's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.