SEE PIC:जान्हवी कपूरच्या कुशीत इशान खट्टर, दोघांचा सेक्सी आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 03:47 PM2018-10-04T15:47:02+5:302018-10-04T15:50:25+5:30

'धडक' सिनेमात जान्हवीसह या सिनेमातील तिचा कोस्टार इशान खट्टरच्या भूमिकेचं कौतुक झालं. रुपेरी पडद्यावर दोघांची जोडी रसिकांना भावली.

SEE PIC :Ishaan Khatter and Janhvi Kapoor's Hot And Romantic Photo Blazes Internet On Fire | SEE PIC:जान्हवी कपूरच्या कुशीत इशान खट्टर, दोघांचा सेक्सी आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

SEE PIC:जान्हवी कपूरच्या कुशीत इशान खट्टर, दोघांचा सेक्सी आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

'धडक' सिनेमानंतर जान्हवी कपूरचा भाव बी-टाऊनमध्ये भलताच वधारला आहे. जान्हवीचा पहिलावहिला सिनेमा ‘धडक’. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं साऱ्यांनीच कौतुक केलं. तेव्हापासूनच जान्हवी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. जान्हवीसह या सिनेमातील तिचा कोस्टार इशान खट्टरच्या भूमिकेचं कौतुक झालं. रुपेरी पडद्यावर दोघांची जोडी रसिकांना भावली. धडक सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. पदार्पणाच्या धडक सिनेमापासून या ना त्या कारणामुळे जान्हवी आणि इशानची जोडी चर्चेत राहिली. ही जोडी आता एका रोमँटिक आणि हॉट फोटोमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. 

इशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवीच्या सेक्सी अदा पाहायला मिळत आहेत. तर रोमँटिक अंदाजात इशान तिच्या मांडीवर झोपल्याचेही या फोटोत दिसत आहे. जान्हवीने काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केले आहे. तर इशानने डेनिम शर्ट परिधान केले असून तो तिच्या मांडीवर झोपल्याचे दिसतंय. दोघांचा हा सेक्सी आणि तितकाच रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

धडक सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवी बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती बड्या स्टार्ससह स्क्रीन शेअर करणार आहे. जान्हवीकडे एका दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याबाबतही विचारणा झाल्याचे बोललं जात आहे. मात्र याबाबत जान्हवीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची चांदनी असणाऱ्या श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच श्रीदेवी यांच्या गाजलेल्या अनेक सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'सदमा' सिनेमाचा रिमेक व्हावा आणि त्यात श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका साकारायला आवडेल अशी प्रतिक्रिया जान्हवीने दिली आहे. सदमा सिनेमातील श्रीदेवी यांनी साकारलेली नेहलता आणि कमल हासनचा सोमू रसिकांना भावला होता. त्यामुळेच सदमा सिनेमातील श्रीदेवी यांच्या आव्हानात्मक भूमिका साकारत आईच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं जान्हवीचं स्वप्न आहे. 

Web Title: SEE PIC :Ishaan Khatter and Janhvi Kapoor's Hot And Romantic Photo Blazes Internet On Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.