तामिळनाडूची अनुकृती वास या सुंदरीने यंदाचा फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला. अनुकृती केवळ १९ वर्षांची आहे. याच १९ वर्षांच्या सुंदरीसाठी कालची १९ जून ही तारीख खास ठरली. मिस इंडियाचा ताज तिच्या शिरावर सजला.भारतातून आलेल्या विविध २९ सौंदर्यवतींशी स्पर्धा करत अनुकृतीने हा ताज आपल्या नावावर केला. सुरूवातीपासूनच अनुकृतीने आघाडी घेतली. मुळात एक खेळाडू असल्याने तिच्यातील आत्मविश्वास सगळ्यांवर भारी पडला.अनुकृती  फ्रेन्चमध्ये बीए करते आहे. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फ्रेन्चमध्ये बीए करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.याशिवाय खेळाडू आणि नृत्यांगणा अशीही तिची ओळख आहे. अनुकृतीने २९ सौंदर्यवतींना मागे टाकत ही चुरसीची स्पर्धा जिंकली. यापूर्वी तिने मिस तामिळनार्ड२०१८ चा किताब आपल्या नावावर केला.मिस इंडिया जिंकल्यानंतर अनुकृती मिस वर्ल्ड २०१८ या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे काल मंगळवारी ही भव्यदिव्य स्पर्धा पडली़ करण जोहर व आयुष्यमान खुराणा यांचे बहारदार सूत्रसंचालन, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थिती आणि सौंदर्य यामुळे आणखीच ग्लॅमरस झालेल्या या सौंदर्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याचा क्षण आला आणि सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली.  कारण भारतातील विविध राज्यांतून आलेल्या ३० सौंदर्यवतींमध्ये जोरदार चुरस होती. दुस-या फेरीत ३० मधून १२ स्पर्धकांची   निवड करण्यात आली. अंतिम फेरीत पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली.ALSO READ : तामिळनाडूच्या अनुकृती वासने जिंकला ‘फेमिना मिस इंडिया2018’ ताज!!

या पाच स्पर्धकांमधूल अखेरच्या क्षणी १९ वर्षांच्या अनुकृती वास हिच्या नावाची घोषणा झाली आणि सगळीकडेचं जल्लोष झाला़ गतवर्षीची मिस इंडिया मानुषी छिल्लर हिने अनुकृतीच्या शिरावर ‘मिस इंडिया’चा मुकूट चढवला़ मानुषी छिल्लर, के एल राहुल, इरफान पठाण, बॉबी देओल, कुणाल कपूर, मलायका अरोरा खान, बॉलीवूडमधील ख्यातनाम फॅशन डिझायनर गौरव गुप्ता आणि महिला पत्रकार डिसूझा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी करिना कपूर, माधुरी दीक्षित, जॅकलिन फर्नांडिस यांचा परफॉर्मन्सही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला़

Web Title: See, 'Femina Miss India 2018' witch glamor photo! 'O' work to fulfill Mother's dream !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.