वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर सर्वाधिक लोकप्रिय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 06:30 AM2019-03-24T06:30:00+5:302019-03-24T06:30:00+5:30

स्कोर ट्रेंड्सच्या आकड़्यांनुसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे.

Scared Games and Mirzapur is most popular in web series world | वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर सर्वाधिक लोकप्रिय!

वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर सर्वाधिक लोकप्रिय!

googlenewsNext
ठळक मुद्देसॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुरच्या दुस-या सीझनची तयारी सुरू आहेअमेझॉन प्राइमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिसऱ्या क्रमांकावर आहे

वेबसीरिजच्या जगतात ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ या भूमिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्या. नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि अमेझॉन प्राइमची ‘मिर्जापुर’ या दोन्ही क्राइम थ्रिलर वेबसीरिज स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेबसीरिज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. 

स्कोर ट्रेंड्सच्या आकड़्यांनुसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे. आर माधवन आणि अमित साध स्टारर अमेझॉन प्राइमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिस-या क्रमांकावर आहे. तर किर्ती कुल्हारी-सायनी गुप्ता स्टारर ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. रोनित रॉय-मोना सिंह स्टारर ‘कहने को हमसफर है’ पाचव्या स्थानी आहे.

सध्या सॅक्रेड गेम्स आणि मिर्ज़ापुरच्या दूस-या सीझनची तयारी सुरू आहे. त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने डिजिटल आणि व्हायरल न्यूज़मध्ये ह्या दोन्ही वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. 

लोकप्रियतेत सगळ्यात अग्रणी स्थानी असलेली सॅक्रेड गेम्स ही मालिका डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूज तिन्हीमध्ये पूर्ण गुण मिळवून नंबर वन स्थानी पोहोचलीय. तर मिर्जापुरने डिजिटल न्यूज, सोशल आणि व्हायरल न्यूज श्रेणींमध्ये चांगला स्कोर केलाय. ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सध्या युवावर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. तर ऑल्ट बालाजीची ‘कहने को हमसफर है’ने गेल्या काही आठवड्यांमध्ये लोकप्रियतेच्या चार्टवर टिकून सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, ''आम्ही वेबसीरिज आणि त्यातले कलाकार ह्यांना स्कोर ट्रेंड्सव्दारे ट्रॅक करायला सुरूवात केल्यावर आम्हांला दिसून आलं, की वेबमालिकांची सध्या सोशल, व्हायरल बातम्या, डिजिटल बातम्या और वृत्तपत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रियता आहे. सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापुर ह्या दोन क्राइम थ्रिलर शोजनी सातत्याने स्कोर ट्रेंड्स चार्टवर लोकप्रियतेत राहून आपलं अढळपद मिळवलेल दिसून येतंय. नुकतीच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ मालिकाही स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर खूप लोकप्रिय होतेय.  

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

 

Web Title: Scared Games and Mirzapur is most popular in web series world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.