Sarah Ali Khan felt Jannahvi Kapoor feared? Read details ... | ​ सारा अली खानला वाटू लागलीय जान्हवी कपूरची भीती? वाचा सविस्तर...

सैफ अली खान व अमृता सिंगची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर यांच्या डेब्यू चित्रपटाची घोषणा झालीयं. एकता कपूर निर्मित आणि अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’मधून सारा डेब्यू करतेय. तर जान्हवी कपूर ही करण जोहर निर्मित आणि शशांक खेतान दिग्दिर्शित ‘धडक’मधून डेब्यू करणार आहे. डेब्यूच्या या घोषणेसोबतच दोघींची तुलनाही सुरु झालीय. याबाबतची आम्ही दिलेली बातमी  तुम्ही वाचली असेलच. आता याच तुलनेच्या अनुषंगाने एक वेगळी बातमी आहे. होय, जान्हवीच्या डेब्यू सिनेमाचे पोस्टर रिलीज होताच सारा अली खान म्हणे, चिंतीत झाली आहे. तिला दबाव जाणवू लागला आहे.ALSO READ :  सारा अली खान अन् जान्हवी कपूरची सुरू झाली तुलना! अशी रिअ‍ॅक्ट झाली श्रीदेवी!!

जान्हवीचा डेब्यू सिनेमा ‘धडक’ हा ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘धडक’चे पोस्टर रिलीज होताच, जान्हवी अचानक चर्चेत आली आणि त्यातुलनेत सारा काहीशी झाकोळली गेली.   याचमुळे सारा टेन्शनमध्ये आलीय. खुद्द एकता कपूरने याचा खुलासा केला आहे. जान्हवी कपूरशी सुरु असलेल्या तुलनेमुळे सारा काहीशी दबावात आली आहे, असे एकता म्हणाली. शिवाय अशी तुलना योग्य नसल्याचे सांगत आपण या मुलांवर विनाकारण दबाव वाढवत असल्याचेही एकताने म्हटले आहे. ही मुले लहान आहेत आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर काही मिळवू पाहत आहे. त्यांना एकटे सोडले जायला हवे. आपण असे करणार नसू तर ही मुले वेडी होतील. ते इथे कलाकार बनायला आली आहेत. सारा ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे. तितकीच गोड मुलगी आहे. सारा व जान्हवी एकत्र डेब्यू करणार आहेत, हे ठीक़ पण त्यांचे नशीब त्या स्वत: घडवणार आहेत, असे एकता म्हणाली.
अलीकडे श्रीदेवीही स्टारकिड्समध्ये होणा-या या तुलनेवर बोलली होती. अर्थात तिने ही तुलना अतिशय खिलाडू वृत्तीने घेतली होती. तुलना होणे यात काहीही गैर नाही. एका क्षेत्रात, एकाचवेळी काम करणाºयांमध्ये तुलना होणारच. स्पर्धा असणार. यात असुया वाटण्याचे कारण नाही. एखादी व्यक्ती तुमची स्पर्धक आहे म्हणून तुम्ही तिला टाळू शकत नाही. ही मनोरंजन इंडस्ट्री आहे आणि अन्य इंडस्ट्रीप्रमाणेच इथेही स्पर्धा आहे. अर्थात या स्पर्धेत टिकायचे तर केवळ आणि केवळ तुमची मेहनत आणि तुमच्यातील प्रतीभा या दोनच गोष्टी कामी येणार आहेत, असे श्रीदेवी म्हणाली होती.
Web Title: Sarah Ali Khan felt Jannahvi Kapoor feared? Read details ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.