Sarah Ali Khan and Jhanwi Kapoor started comparing! Sridevi was reelected. | ​ सारा अली खान अन् जान्हवी कपूरची सुरू झाली तुलना! अशी रिअ‍ॅक्ट झाली श्रीदेवी!!

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिने तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल कुठलीही कसर सोडलेली नाही. ‘बेभरवशा’च्या इंडस्ट्रीमध्ये पहिले पाऊल टाकणे हा एक मोठा डाव आहे आणि सारा यात जिंकण्याच्या इराद्यानेच उतरलीयं. सध्या ‘केदारनाथ’ या साराच्या डेब्यू सिनेमाचे शूटींग  ब-यापैकी आटोपले आहे. याचदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूरची ग्लॅमरस लेक जान्हवी कपूर हिच्या डेब्यूची घोषणा झाली आहे. ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवी डेब्यू करतेय. कालच जान्हवीच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले. या चित्रपटात ती शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. आता ही एवढी मोठी हिस्ट्री सांगण्याचे कारण म्हणजे, सारा व जान्हवी दोघींमध्येही तुलना सुरु झाली आहे. खरे तर, डेब्यूच्या बाबतीत कदाचित सारा जान्हवीपेक्षा एक पाऊल पुढे आहे. कारण साराच्या ‘केदारनाथ’चे शूटींग कधीचेच सुरु झालेयं आणि आत्ताकुठे कुठे जान्हवीचा ‘धडक’चे पहिले पोस्टर आलेयं. पण जान्हवीच्या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर येताच, लोकांनी जान्हवी व सारा या दोघींमध्ये तुलना सुरु केली आहे. केवळ गुणा-रूपावरून नाही तर दोघींपैकी कुणाचा चित्रपट आधी रिलीज होईल, अशी सुद्धा तुलना होत आहे.  ALSO READ: पोस्टर रिलीज! अखेर श्रीदेवीच्या लेकीच्या ‘डेब्यू’चा मुहूर्त ठरला; पाहा, जान्हवी कपूर व ईशान खट्टरची गजब केमिस्ट्री!!

सारा व जान्हवीत सुरु असलेल्या या तुलनेबद्दल अलीकडे श्रीदेवीला विचारण्यात आले.  पण श्रीदेवीने ही तुलना अतिशय खिलाडू वृत्तीने घेतली. तुलना होणे यात काहीही गैर नाही. एका क्षेत्रात, एकाचवेळी काम करणाºयांमध्ये तुलना होणारच. स्पर्धा असणार. यात असुया वाटण्याचे कारण नाही. एखादी व्यक्ती तुमची स्पर्धक आहे म्हणून तुम्ही तिला टाळू शकत नाही. ही मनोरंजन इंडस्ट्री आहे आणि अन्य इंडस्ट्रीप्रमाणेच इथेही स्पर्धा आहे. अर्थात या स्पर्धेत टिकायचे तर केवळ आणि केवळ तुमची मेहनत आणि तुमच्यातील प्रतीभा या दोनच गोष्टी कामी येणार आहेत, असे श्रीदेवी म्हणाली. श्रीदेवी स्पर्धा आणि तुलना इतकी खिलाडूवृत्तीने स्वीकारते म्हटल्यानंतर तिची लेकही याच मार्गावर चालणारी असावी, अशी आशा करूयात आणि जान्हवीला शुभेच्छा देऊ यात. होय ना?
Web Title: Sarah Ali Khan and Jhanwi Kapoor started comparing! Sridevi was reelected.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.