Sarah Ali Khan and Jhanvi Kapoor to play 'cat fights' | ​सारा अली खान व जान्हवी कपूर दोघीत रंगणार ‘cat fights’!!

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघीही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहेत. होय, सारा अली खानचा ‘केदारनाथ’ यंदा डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. तर जान्हवीचा ‘धडक’ हा सिनेमा  त्याआधी जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्यामुळे जान्हवी अन् सारा दोघींनाही स्क्रिनवर पाहण्यास पे्रक्षक आतूर आहेत.  अर्थात त्याआधी डेब्यूच्या घोषणेसोबतच दोघींची तुलनाही सुरु झालीय आणि आता तर एक वेगळीच बातमी आलीय. होय, बातमी काय तर जान्हवी व सारा या दोघींमध्येही जाणीवपूर्वक अगदी प्लानिंगसह घडवून आणण्यात येत असलेल्या कॅट फाईटबद्दल. होय, ऐकता ते अगदी खरे आहे.

खरे तर जान्हवी आणि सारा या दोघीही चांगल्या मैत्रिण आहे.  चित्रपटांची घोषणा होण्यापूर्वी दोघीही अनेकदा एकत्र दिसल्या आहेत. पण आता म्हणे, या दोघींनाही एकत्र येणे टाळा, असा सल्ला देण्यात आल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर, सारा व जान्हवी दोघींनाही एकमेकींच्या मैत्रिणी नाही तर कट्टर प्रतिस्पर्धी बनून वावरण्याचा सल्ला दिला गेला आहे. पार्टीत एकमेकांसमोर आल्या तरी एकमेकींशी बोलणे टाळा. परस्परांबद्दल अ‍ॅटिट्यूड दाखवा. किमान मीडियापासून तरी तुमचे पर्सनल बॉन्डिंग लपवून ठेवा, असे या दोघींना सांगितले जात आहे. यामुळे मीडियात दोघींच्याही कॅट फाईटची चर्चा रंगेल आणि त्याचा दोघींनाही करिअरच्या या टप्प्यावर तोटा होण्याऐवजी फायदाच अधिक होईल, हा यामागचा उद्देश आहे.  

ALSO READ : ​ सारा अली खानला वाटू लागलीय जान्हवी कपूरची भीती? वाचा सविस्तर...

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिने तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल कुठलीही कसर सोडलेली नाही. ‘बेभरवशा’च्या इंडस्ट्रीमध्ये पहिले पाऊल टाकणे हा एक मोठा डाव आहे आणि सारा व जान्हवी दोघेही यात जिंकण्याच्या इराद्यानेच उतरल्यात. आता डाव जिंकायचा तर त्यासाठी असे काही डावपेच आलेच. सध्या साराच्या डेब्यू सिनेमाचे  अर्थात ‘केदारनाथ’ या शूटींग  ब-यापैकी आटोपले आहे. याचदरम्यान जान्हवी कपूर हिच्या डेब्यू सिनेमाचेही जोरात शूटींग सुरु आहे.  कालच जान्हवीच्या या चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च करण्यात आले. या चित्रपटात ती शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. 

Web Title: Sarah Ali Khan and Jhanvi Kapoor to play 'cat fights'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.