​सारा, जान्हवी नाहीच! ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये दिसणार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2017 06:45 AM2017-07-04T06:45:18+5:302017-07-04T12:16:11+5:30

करण जोहर लवकरच आपल्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’चा सीक्वल घेऊन येतोय. जेव्हापासून या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होतेय, तेव्हापासून यात ...

Sara, not sure! Chunky Pandey's daughter Ananya Pandey to appear in 'Student of the Year2' | ​सारा, जान्हवी नाहीच! ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये दिसणार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे!

​सारा, जान्हवी नाहीच! ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये दिसणार चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे!

googlenewsNext
ण जोहर लवकरच आपल्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’चा सीक्वल घेऊन येतोय. जेव्हापासून या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होतेय, तेव्हापासून यात हिरोईन म्हणून कुणाची वर्णी लागेल, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. आधी यात सैफ अली खान  व अमृता सिंहची मुलगी सारा खान दिसणार, अशी बातमी आली तर नंतर श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर   दिसणार, असे कानावर आले. हे कमी की काय, टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हिच्याही नावाची चर्चा झाली. पण आता या सगळ्यांवर मात करत, एका नव्या स्टार डॉटरचे नाव चर्चेत आले आहे. होय, ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे.‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ लीड भूमिकेत आहे.
अलीकडे अनन्या तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली होती. चंकी पांडे सध्या आपल्या कुटुंबासोबत कॅलिफोर्नियात सुट्टी एन्जॉय करतोय. मध्यंतरी भाईजान सलमान खान अनन्याला लॉन्च करणार, अशी बातमी होती. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल हायस्कूलमधून तिने अलीकडे तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी ती एकदम सज्ज आहे. 

ALSO READ : ​ ‘ही’ आहे चंकी पांडेची ग्लॅमरस मुलगी अनन्या ! लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!

‘स्टुडंट आॅफ द ईअर’मध्ये दोन हिरो व एक हिरोईन दिसली होती. तर ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये एक हिरो व दोन हिरोईन असणार आहेत. यापैकी एक हिरोईन अनन्या असणार, अशी खबर आहे. अर्थात अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. आता अन्ययाचे नाव फायनल झाले असेल तर यातील दुसरी हिरोईन कोण, याबाबतची उत्सुकता असेलच.

Web Title: Sara, not sure! Chunky Pandey's daughter Ananya Pandey to appear in 'Student of the Year2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.