सारा अली खानने 'ह्या' सीक्वलमध्ये काम करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 07:05 PM2019-01-31T19:05:43+5:302019-01-31T19:06:32+5:30

साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा 'सिम्बा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराच्या कामाची प्रशंसा खूप झाली.

Sara Ali Khan refused to work in this sequel | सारा अली खानने 'ह्या' सीक्वलमध्ये काम करण्यास दिला नकार

सारा अली खानने 'ह्या' सीक्वलमध्ये काम करण्यास दिला नकार

googlenewsNext
ठळक मुद्दे 'लव्ह आज कल २' चित्रपटातून माघार घेतली सारानेचित्रपटामध्ये माझी भूमिका केवळ नावापुरती - सारा

२००९ साली प्रदर्शित झालेला 'लव्ह आज कल' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात दीपिका पादुकोण व सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील सर्व मुख्य पात्रांनी रसिकांना चांगलीच भुरळ पाडली होती. आता या सिनेमाचा सीक्वल येणार असून यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान व हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात साराने काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. 

साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा 'सिम्बा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराच्या कामाची प्रशंसा खूप झाली. त्यानंतर ती 'लव्ह आज कल २' चित्रपटात झळकणार होती. मात्र चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे. लव्ह आज कल २च्या माध्यमातून पहिल्यांदाच मला वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र चित्रपटात माझ्या वाट्याला चांगली भूमिका आली असती तर मी नक्कीच या चित्रपटाचा विचार केला असता. या चित्रपटामध्ये माझी भूमिका केवळ नावापुरती आहे, त्यामुळे मी या चित्रपटासाठी माझा नकार दिला आहे, असे साराने एका मुलाखतीत सांगितले. 'लव्ह आज कल २' हा चित्रपट इम्तियाज अली दिग्दर्शित करणार आहेत.
 

Web Title: Sara Ali Khan refused to work in this sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.