कन्फर्म ! ‘कुली नंबर १’च्या रिमेकमध्ये वरूण धवनसोबत दिसणार सारा अली खान !!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:40 AM2019-03-22T11:40:04+5:302019-03-22T11:42:20+5:30

वरुण धवन सध्या ‘कलंक’ आणि ‘स्ट्रिट डान्सर’ या दोन चित्रपटांत बिझी आहे. या दोन चित्रपटानंतर वरूण एक धमाकेदार चित्रपट घेऊन येतोय. हा चित्रपट कुठला तर ‘कुली नंबर १’ या सुपरडुपर हिट सिनेमाचा रिमेक.  वरूणचे पापा डेव्हिड धवन हे हा रिमेक दिग्दर्शित करणार आहेत.

Sara Ali Khan CONFIRMED to be a part of Varun Dhawan's Coolie No. 1 | कन्फर्म ! ‘कुली नंबर १’च्या रिमेकमध्ये वरूण धवनसोबत दिसणार सारा अली खान !!

कन्फर्म ! ‘कुली नंबर १’च्या रिमेकमध्ये वरूण धवनसोबत दिसणार सारा अली खान !!

googlenewsNext
ठळक मुद्दे१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर १’मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. त्यांच्याशिवाय कादर खान, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर या दिग्गज अभिनेत्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

वरुण धवन सध्या ‘कलंक’ आणि ‘स्ट्रिट डान्सर’ या दोन चित्रपटांत बिझी आहे. या दोन चित्रपटानंतर वरूण एक धमाकेदार चित्रपट घेऊन येतोय. हा चित्रपट कुठला तर ‘कुली नंबर १’ या सुपरडुपर हिट सिनेमाचा रिमेक.  वरूणचे पापा डेव्हिड धवन हे हा रिमेक दिग्दर्शित करणार आहेत. आता या रिमेकमध्ये सारा अली खानची एन्ट्री झालीय.
होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कुली नंबर १’मध्ये साराची वर्णी लागली आहे. संवाद लेखक फरहाद सामजी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘वरूणसारख्या अभिनेत्यासोबत काम करणे कुठल्याही लेखकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी नुकतेच त्याला संवाद ऐकवले आणि त्याने लगेच रिहर्सलसाठी या संवादाची एक कॉपी मागवून घेतली. ‘कुली नंबर १’ सुरु व्हायला वेळ आहे. पण वरूण त्यासाठी रिहर्सल करू इच्छितो. मी सारासोबत दुसºयांदा काम करण्यासही उत्सूक आहे,’ असे फरहाद यांनी सांगितले. फरहाद यांनी यापूर्वी रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’साठी संवाद लिहिले होते. या चित्रपटात सारा अली खान व रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होते. सारा सध्या इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’मध्ये बिझी आहे.


‘कुली नंबर १’च्या रिमेकपूर्वी डेव्हिड धवन यांनी १९९७ मध्ये प्रदर्शित ‘जुडवा’चा रिमेक बनवला होता. यात वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते. ‘जुडवा 2’आधी वरूणने पापा डेव्हिड धवनच्या ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटात काम केले आहे.
१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर १’मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. त्यांच्याशिवाय कादर खान, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर या दिग्गज अभिनेत्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘कुली नंबर १’ या चित्रपटापासून डेव्हिड धवन यांच्या ‘नंबर १’ सीरिजची सुरुवात झाली. यानंतर हिरो नंबर १, बीवी नंबर १, जोडी नंबर १ असे अनेक चित्रपट त्यांनी बनवले.

Web Title: Sara Ali Khan CONFIRMED to be a part of Varun Dhawan's Coolie No. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.