सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेल्या सपना व्यास-पटेलच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सपनाचे फोटोमधील सौंदर्य बघून नेटिझन्स अक्षरश: तिच्या प्रेमात पडत आहेत. कारण सपनाचा प्रत्येक फोटो नेटिझन्सकडून प्रचंड प्रमाणात पसंत केला जात असून, तो फोटो वाºयासारखा व्हायरलही केला जात आहे. त्यामुळेच केवळ इन्स्टाग्रामवर सपनाच्या फॉलोअर्सची संख्या १५ लाखांपेक्षा अधिक आहे. तर फेसबुक आणि ट्विटरवरील तिचे फॅन्स फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत; मात्र या सौंदर्यवतीचा राजकुमार तिने निवडलेला असून, तो अद्यापपर्यंत लाइमलाइटपासून दूर आहे. २७ वर्षीय सपना विवाहित असून, तिच्या पतीला प्रसिद्धीझोतापासून तिने दूर ठेवले आहे. त्यामुळेच बहुतांश लोकांना सपना विवाहित आहे, याची माहितीच नाही. फिटनेस ट्रेनर आणि मॉडेल म्हणून काम करीत असलेली सपना आज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे; मात्र सपना सोशल मीडियावर केव्हा व्हायरल झाली? ती केव्हापासून सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे? या प्रश्नांची उत्तरे अनेकांना अजूनही माहिती नाहीत. वास्तविक आसाम निवडणुकीप्रसंगी सपनाचा एक फोटो अंगूरलता डेका नावाने व्हायरल झाला होता; मात्र फोटोमध्ये दिसणारी सुंदर तरुणी अंगूरलता डेका नसून सपना व्यास-पटेल आहे, हे पुढे सिद्ध झाले. वास्तविक सपनानेच तिच्या सोशल अकाउंटवरून याबाबतचा खुलासा केला होता. पुढे सपनाने तिचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली. 

सपनाला इन्स्टाग्रामवर १५ लाख लोक फॉलो करतात. तर फेसबुकवर तिच्या फॉलोअर्सची संख्या ३५४९६० इतकी आहे. त्याचबरोबर यू-ट्यूब चॅनलवरही सपनाचीच जादू आहे. तिच्या चॅनलला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी सबस्क्राइब केले आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती लोकांना फिटनेससंबंधी टिप्स देत असते. त्याचबरोबर सेलिब्रिटींच्या मुलाखतीही घेत असते. सपना गुजरातचे माजी आरोग्यमंत्री जयनारायण व्यास यांची मुलगी आहे. सध्या सपना अहमदाबाद येथे राहते. 

फोटोमध्ये स्लीम दिसत असलेली सपना एकेकाळी खूपच स्थूल होती. जेव्हा ती १९ वर्षांची होती, तेव्हा तिला तिच्या स्थूलपणामुळे लोक चिडवित होते. पुढे तिने वजन कमी करण्याचा निर्धार केला. यासाठी तिने कुठलीही सर्जरी अथवा औषधे घेतले नाही. सपनाने तिचे डायट कंट्रोल केले. कार्डियो एक्सरसाइजबरोबर तिने वेट ट्रेनिंग आणि टेनिस खेळाचा आधार घेतला. सपनाच्या मते, वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. वजन कमी करण्यासाठी दररोज एक तास वॉक आणि ४५ मिनिटे अन्य एक्सरसाइज करणे पुरेसे आहे. सध्या सपना सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेतला चेहरा असून, लवकरच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. दिव्या भारतीसारख्या काहीसा लूक असलेल्या सपनाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चेने अभिनेत्रींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता सपनाने बॉलिवूड डेब्यू करून आपला अदा दाखवाव्यात हीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. 
Web Title: Sapna Vyas, who has 1.5 million followers, is 'Ha' of Rajkumar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.