Sapna Chowdhary, not on Sunny Leone's song 'Chris Gayle', watch the video! | सपना चौधरी नव्हे सनी लिओनीच्या ‘या’ गाण्यावर थिरकला ख्रिस गेल, पाहा व्हिडीओ!

बिग बॉस फेम सपना चौधरीने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हिडीओमध्ये तुफानी बॅटिंग करणारा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल डान्स करताना दिसत आहे. ख्रिस गेलचा हा अंदाज पाहताच सपनाने तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ अपलोड केला. चाहत्यांनाही हा व्हिडीओ इतका आवडला की, त्यांनी तो शेअर करण्यास सुरुवात केली. सपनाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पाहा मला इंटरनेटवर काय मिळाले?, ख्रिस गेल, तू खरोखरच खूप चांगला डान्सर आहेस !’ व्हिडीओत गेल सपनाच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 
 

मात्र आता ख्रिस गेलच्या या व्हिडीओचे खरे वास्तव समोर आले आहे. होय, गेल ज्या गाण्यावर तुफान डान्स करीत आहे, ते गाणे सपनाचे नसून, बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचे आहे. ख्रिस गेलच्या या व्हिडीओला मॅशअप करून त्यास सपनाचे गाणे जोडले आहे. वास्तविक ख्रिस गेल, सपनाच्या ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर डान्स करीत नसून, सनी लिओनीच्या ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर थिरकत आहे. 

दरम्यान, सपनाने जेव्हा तिच्या इन्स्टाग्रामवर गेलचा हा व्हिडीओ अपलोड केला होता, तेव्हा त्यास अनेक यूजर्सच्या प्रतिक्रिया आल्या. सपनाच्या चाहत्यांना हे बघून खूपच आनंद झाला होता की, ख्रिस गेलसारखा महान क्रिकेटपटू सपनाच्या गाण्यावर थिरकत आहे. अनेकांनी तर, ख्रिस गेल सपनासोबत एखाद्या व्हिडीओमध्ये काम करीत असावा असा अंदाजही लावण्यास सुरुवात केली होती. एका यूजरने कॉमेण्टमध्ये लिहिले होते की, ‘गेलसोबत सपनाचा अल्बम लॉन्च होणार आहे.’ दरम्यान, ख्रिस गेलने २०१७ मध्ये इंटरनेटवर एक चॅलेंज (-#ChrisGayleDanceChallenge) ठेवले होते. त्या चॅलेंजचाच हा व्हिडीओ एक पार्ट असल्याचे समोर येत आहे. 

Web Title: Sapna Chowdhary, not on Sunny Leone's song 'Chris Gayle', watch the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.