Sanjay Leela Ranveer Singh and Deepika Padukone caught in the trap of Bhansali again! | ​पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींच्या जाळ्यात अडकले रणवीर सिंग व दीपिका पादुकोण!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या जोडीसोबत आत्तापर्यंत तीन चित्रपट बनवलेत आणि हे तिन्ही चित्रपट तुफान गाजलेत. अलीकडे आलेल्या  ‘पद्मावत’ने तर बॉक्सआॅफिसवर अभूतपूर्व यश मिळवले.  यातील दीपिका व रणवीरच्या कामाचेही वारेमाप कौतुक झाले. ताज्या बातमीनुसार, ‘पद्मावत’नंतर भन्साळींच्या मनात पुन्हा एकदा कसली ती ‘खिचडी’ शिजतेय. सूत्रांचे मानाल तर भन्साळींनी रणवीर व दीपिका या आपल्या आवडत्या जोडीला पुन्हा तीन चित्रपटांसाठी साईन केले आहे. दीपिका व रणवीरच्या परफॉर्मन्सपेक्षाही या दोघांचे कामाप्रतिचे समर्पण आणि प्रेम यामुळे भन्साळी अधिक प्रभावित आहेत. हेच कारण आहे की, या जोडीसोबत भन्साळींनी आणखी तीन चित्रपट साईन केले आहेत. आता या बातमीत सत्यता असेल तर कमीत कमी पुढील सहा वर्षे रणवीर व दीपिका या दोघांना भन्साळींसोबत काम करावे लागेल. आता केवळ ही बातमी किती खरी ठरते, तेच बघायचेयं.अलीकडे एका मुलाखतीत भन्साळी रणवीर व दीपिकाबद्दल भरभरून बोलले होते. दीपिका एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे. ती मला प्रचंड आवडते. स्वत:चे काम अतिशय शांततेत आणि निष्ठेने ती पूर्ण करते. मी तिच्यासोबत आणखीही काम करू शकतो, असे भन्साळी म्हणाले होते. रणवीरचीही त्यांनी तोंडभरून प्रशंसा केली होती. रणवीरला माझ्या इतका दुसरा कुणीही दिग्दर्शक चांगला समजू शकत नाही. त्याच्याकडून कसे काम काढून घ्यायचे, हे मला कळते. आम्हा दोघांची केमिस्ट्री अफलातून आहे. रणवीर माझ्यासाठी एक स्पेशल अ‍ॅक्टर आहे, असे भन्साळी म्हणाले होते. आता इतक्या स्पेशल अ‍ॅक्टर आणि आवडत्या अभिनेत्रीसोबत पुन्हा काम करणे तर बनतेच. तूर्तास भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या तरी भन्साळी पुन्हा एकदा एक मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार, इतकीच चर्चा आहे. तसेही भन्साळी त्यांच्या ‘लार्जद दॅन लाईफ’ सिनेमासाठी ओळखले जातात. आता त्यांच्या या ‘लार्जद दॅन लाईफ’ सिनेमात दीपिका-रणवीरची वर्णी लागते की आणखी दुसºया कुणाची, ते बघूच.

ALSO READ : जणू माझ्या मुलांवर हल्ला होतोय, असे मला वाटत होते.... ! ‘पद्मावत’ वादावर बोलले संजय लीला भन्साळी !!
Web Title: Sanjay Leela Ranveer Singh and Deepika Padukone caught in the trap of Bhansali again!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.