Sanjay Leela Bhansali's 'One' decision that bistroli Twinkle Khanna! Read the whole news !! | ​संजय लीला भन्साळींच्या ‘या’ एका निर्णयाने अशी बिथरली ट्विंकल खन्ना! वाचा संपूर्ण बातमी!!

येत्या २५ जानेवारीला बॉक्सआॅफिसवरचा मोठा संघर्ष अटळ मानला जात आहे आणि या संघर्षामुळे अक्षय कुमारची बेटर हाफ  ट्विंकल खन्ना नाराज असल्याची खबर आहे.
होय, येत्या २५ जानेवारीला संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीज होतो आहे. याच तारखेला अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ही प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे आणि नेमक्या या कारणाने  ट्विंकल बिथरली आहे. खरे तर या बॉक्सआॅफिस क्लॅशवर अक्षय कुमार कमालीचा शांत आहे. पण  ट्विंकलने मात्र यावर चुप्पी तोडत अप्रत्यक्षपणे भन्साळींबद्दलची नाराजी जाहिर केली आहे. बॉक्सआॅफिसवरचा क्लॅश दोन्ही पक्षांसाठी चांगला नाही. दोन्ही चित्रपटांवर याचा परिणाम होणार. ‘पद्मावत’च्या मेकर्सला रिलीज डेटसाठी बराच संघर्ष करावा लागला, हे मला ठाऊक आहे. पण तरिही भन्साळींचा हा चित्रपट ‘पॅडमॅन’च्या एक आठवडा मागे वा पुढे रिलीज व्हावा, अशी माझी इच्छा होती. ‘पद्मावत’ एक अद्भूत चित्रपट असेल, यावर माझा विश्वास आहे. पण आम्हाला आमच्या चित्रपटाच्या कंटेटवरही तेवढाच विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आमच्या चित्रपटाच्या म्हणजेच ‘पॅडमॅन’च्या रिलीज डेटमध्ये कुठलाही बदल करणार नाही. आम्हाला आमच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी २५ जानेवारी हीच तारीख हवी आहे, असे ट्विंकल म्हणाली.अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट सामाजिक मुद्यावर आधारित चित्रपट आहे. ‘पद्मावत’मुळे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडणार, अशी आधी चर्चा होती. पण मेकर्सनी आपल्या आधीच ठरलेल्या तारखेत कुठलाही बदल न करण्याचा निर्धार केला. त्यामुळे आता बॉक्सआॅफिसवर ‘पद्मावत’विरूद्ध ‘पॅडमॅन’असा सामना रंगताना आपण पाहू शकणार आहोत.

ALSO READ :  अक्षयकुमारने थोपटले दंड; म्हटले ‘पॅडमॅन’ ठरलेल्या तारखेलाच रिलीज होईल!

‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मुरूगनाथनची भूमिका साकारताना दिसतोय. अरूणाचलम यांनी आपल्या गावातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देऊ, अशी शपथ घेतली होती. या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. 

Web Title: Sanjay Leela Bhansali's 'One' decision that bistroli Twinkle Khanna! Read the whole news !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.