संजय लीला भन्साळींना भावला साऊथचा ‘हा’ सिनेमा! खरेदी केलेत हक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:23 PM2018-08-20T19:23:49+5:302018-08-20T19:28:01+5:30

‘पद्मावत’नंतर संजय लीला भन्साळींचा पुढचा चित्रपट कुठला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा भन्साळी वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करणार, अशा बातम्या येत असतात. पण अद्यापही भन्साळींनी कुठलीच घोषणा केलेली नाही. 

sanjay leela bhansali has acquired the hindi remake rights of tamil film kaththi | संजय लीला भन्साळींना भावला साऊथचा ‘हा’ सिनेमा! खरेदी केलेत हक्क!!

संजय लीला भन्साळींना भावला साऊथचा ‘हा’ सिनेमा! खरेदी केलेत हक्क!!

googlenewsNext

‘पद्मावत’नंतर संजय लीला भन्साळींचा पुढचा चित्रपट कुठला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकदा भन्साळी वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करणार, अशा बातम्या येत असतात. पण अद्यापही भन्साळींनी कुठलीच घोषणा केलेली नाही. ताज्या बातमीनुसार, तूर्तास भन्साळींची नजर एका साऊथ चित्रपटावर आहे आणि त्यांनी या चित्रपटाचे राईट्सही खरेदी केल्याचे कळतेय.
या साऊथ चित्रपटाचे नाव आहे, ‘कत्थी’. भन्साळी या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार असल्याचे कळतेय. हा चित्रपट भन्साळी प्रोड्यूस करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करेल, हे अद्याप निश्चित नाही. भन्साळींच्या या चित्रपटात अक्षय कुमार काम करणार, असेही कळतेय. अक्षयने भन्साळी निर्मित ‘राऊडी राठौर’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट ‘विक्रमारकुडू’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.


सन २०१४ मध्ये आलेला ‘कत्थी’ हा चित्रपट ए. आर. मुरूगदास यांनी दिग्दर्शित केला होता. विजय आणि सामंथा अक्कीनेनीने या चित्रपटात लीड भूमिका साकारली होती. या चित्रपटात नील नितीन मुकेशही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. ‘कत्थी’चा अर्थ होतो चाकू. पण या ‘कत्थी’चा अर्थ असा नाही. काथिरेसन आणि जीवनानथम नावाच्या एक सारख्या दिसणाऱ्या दोन तरूणांची कथा या चित्रपटात आहे़. ते शेतक-यांच्या आत्महत्येविरोधात आवाज उठवतात. बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने १३० कोटी रूपयांचा बिझनेस केला होता. या चित्रपटाशिवाय भन्साळी ‘पुलिमुरूगन’ या मल्याळम चित्रपटाचाही हिंदी रिमेक बनवणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती.

Web Title: sanjay leela bhansali has acquired the hindi remake rights of tamil film kaththi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.