Sanjay Kapoor's Lake Shaniya took a brother's wedding towel; Video got viral! | संजय कपूरची लेक शनायाने भावाच्या लग्नात लावले ठुमके; व्हिडीओ झाला व्हायरल!

अभिनेता मोहित मारवाह याने नुकतेच त्याची लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड अंतरा मोटवानी हिच्यासोबत अतिशय धुमधडाक्यात लग्न केले. मोहित आणि अंतराने यूएई येथे साताजन्माच्या गाठी बांधल्या. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. मोहितचा चुलत भाऊ अर्जुन कपूर, सोनम कपूर, रेहा कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी लग्नात भरपूर एन्जॉय केला. त्याचबरोबर अनिल कपूर, बोनी कपूर, श्रीदेवी आणि संजय कपूर हेदेखील लग्न  सोहळ्यात बघावयास मिळाले. या सोहळ्यात संजय कपूरची लेक शनाया कपूरने तर असे काही ठुमके लावले की, उपस्थित दंग झाले. शनायाच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शनायाचे हे ठुमके बघून ती जान्हवी आणि सोनम कपूरपेक्षा कमी नाही असेच काहीसे दिसून आले. या लग्नसोहळ्यात शनाया खूपच सुंदर दिसत होती. शनायाने यावेळी सीमा खानने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. गोल्डन क्रॉप चोळी आणि रेड शायनिंग लहेंग्यामध्ये शनाया खूपच सुंदर दिसत होती. यावेळी शनायाचा डान्स खूपच चर्चेत राहिला. तिने जबरदस्त परफॉर्मन्स करताना अनेकांना दंग केले. शनाया यावेळी अनेक रितीरिवाज पाळतानाही बघावयास मिळाली. 
 

दरम्यान, शनाया व्यतिरिक्त तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूर यानेही जोरदार डान्स केला. अर्जुन आणि अनिल कपूर मोहितच्या वरातीत अनिल कपूर स्टाइल डान्स करताना बघावयास मिळाले, तर कधी अर्जुन नवरदेवाच्या बग्गीमध्ये उभा राहून नाचताना दिसून आला. या लग्नात सोनम कपूरही तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत पोहोचली होती. त्याव्यतिरिक्त करण जोहर, श्वेता बच्चन, अथिया शेट्टी, अधर जैन, सीमा खान हेदेखील उपस्थित होते. 
Web Title: Sanjay Kapoor's Lake Shaniya took a brother's wedding towel; Video got viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.