Sanjay Dutt's 'Peshawar' photographs caused a shock on social media, see her! | संजय दत्तची मुलगी त्रिशालाच्या ‘या’ फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ, पाहा तिच्या अदा!

बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिचा एक नवा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर त्रिशालाने तिचे फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. व्हाइट ड्रेसमध्ये दिसत असलेल्या त्रिशालाचा अंदाज बघण्यासारखा आहे. तिच्या या फोटोने सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बºयाच लोकांनी तर त्रिशालाचा हा फोटो बघून तिच्या बॉलिवूड डेब्यूविषयी कयास लावण्यासही सुरुवात केली आहे. अनेक यूजर्सनी त्रिशाला बॉलिवूड एण्ट्रीची तयारी तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला. वास्तविक त्रिशाला त्या स्टार डॉटर्सपैकी आहे जिला बॉलिवूडमध्ये बघण्यास चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटोज् शेअर केले होते. हे फोटो त्यावेळी प्रचंड पसंतही केले गेले. आता पुन्हा एकदा तिच्या या फोटोंनी खळबळ उडवून दिली आहे. 

संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची त्रिशाला मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशिब आजमावत आहे. २०१४ मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. तिने न्यू यॉर्कमधील जॉन जे कॉलेज आॅफ क्रिमिनल जस्टिसमध्ये लॉ याविषयी पदवीचे शिक्षण घेतले. 
 

संजय दत्तने ऋचा शर्मासोबत १९८७ मध्ये लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने १० डिसेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत. 
Web Title: Sanjay Dutt's 'Peshawar' photographs caused a shock on social media, see her!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.