अक्षय कुमारच्या 'हाउसफुल-4'मधून संजय दत्तची एक्झिट, 'या' दमदार कलाकारची झाली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 03:05 PM2018-07-05T15:05:22+5:302018-07-05T15:16:23+5:30

हाउसफुल', 'हाउसफुल- 2' आणि 'हाउसफुल-3' सारख्या हिट चित्रपटांचीसीरिज बनवल्यानंतर साजिद नाडियाडवाला पुन्हा एकदा यासीरिजचा चौथा चित्रपट घेऊन येतोय.

Sanjay Dutt's exit from Akshay Kumar's 'Housefull 4' | अक्षय कुमारच्या 'हाउसफुल-4'मधून संजय दत्तची एक्झिट, 'या' दमदार कलाकारची झाली एंट्री

अक्षय कुमारच्या 'हाउसफुल-4'मधून संजय दत्तची एक्झिट, 'या' दमदार कलाकारची झाली एंट्री

googlenewsNext
ठळक मुद्देहाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे.‘हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता, या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता

'हाउसफुल', 'हाउसफुल- 2' आणि 'हाउसफुल-3' सारख्या हिट चित्रपटांचीसीरिज बनवल्यानंतर साजिद नाडियाडवाला पुन्हा एकदा यासीरिजचा चौथा चित्रपट घेऊन येतो आहे. साजिद खान 'हाउसफुल 4'च्या माध्यमातून पुन्हा एकदा यासीरिजचा भाग बनतो आहे. 'हाउसफुल-3' चे दिग्दर्शन तो काही कारणांमुळे करु शकला नव्हता. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सतत त्याच्या स्टारकास्टबाबत चर्चा होतेय. अजूनपर्यंत याचित्रपटात कोण-कोण कलाकार असणार आहेत हे स्पष्ट झालेले नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टारकास्टबाबत अजून कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र तरीही चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पूजा हेगडे आणि कृति खरबंदासारखे कलाकार 'हाउसफुल-4' मध्ये कन्फर्म असल्याचे बोलले जातेय.  

या कलाकरांसोबत यात संजय दत्तचे नाव ही 'हाउसफुल-4' साठी चर्चेत होते. संजय यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जाते होते. मात्र बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार संजय दत्त 'हाउसफुल 4' मध्ये दिसणार नाहीय. चित्रपटाचे निर्माते सतत यासंदर्भात संजूबाबाशी चर्चा करत होते मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही. संजय दत्त यांच्या जागेवर आता यात नाना पाटेकर दिसणार आहेत. 
  
‘हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे बजेट दोनशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटासाठी हॉलिवूड येथून वीएफएक्स टीमलाही बोलावण्यात आले आहे. 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Sanjay Dutt's exit from Akshay Kumar's 'Housefull 4'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.