Sanjay Dutt was born after two days of taking drugs! The servant was crying for a meal! | ड्रग्ज घेतल्यानंतर एकदम दोन दिवसांनी उठला होता संजय दत्त! जेवण मागितल्यावर रडू लागला होता नोकर!!

बॉलिवूडमध्ये बाबा नावाने ओळखला जाणारा संजय दत्त याने आपल्या आयुष्यात अनेक चढऊतार बघितले. सिल्व्हर स्क्रिनवरचा एक चमचमता तारा ते एक ड्रग्ज अ‍ॅडिक्ट, मग मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टमधील एक आरोपी ते तुरुंगवास भोगलेला कोठडीतील एक कैदी, असे सगळे काही संजयने बघितले. ग्लॅमर असो वा व्यसनाच्या चक्रव्युहातील काळा कुट्ट अंधार, गर्लफ्रेन्डची सोबत वा तुरुंगातील अंगावर येणारे एकाकीपण संजयने आयुष्यातील प्रत्येक रंग अनुभवला, जगला. त्याच्या आयुष्यातील हेच रंग, अनुभव आता राजकुमार हिरानी आपल्या ‘संजू’ नामक चित्रपटात दाखवणार आहेत. रणबीर कपूर यात संजय दत्तची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणार आहे.  
या चित्रपटात संजयच्या आयुष्याची काळी बाजूचं नाही तर त्याच्या आयुष्यातील काही आनंदी क्षणही या चित्रपटात दिसणार आहेत. संजयचे त्याच्या वडिलांसोबतचे नाते आणि त्यांची बॉन्डिंगही यात आहे. संजयचे ड्रग्जचे व्यसन हा त्याच्या आयुष्यातील सगळयात वाईट काळ होता. एकेकाळी ड्रग्जच्या व्यसनाने संजयला आपल्या विळख्यात घेतले होते, हे सगळेच जाणतात. पण यादरम्यान संजयने काय काय सहन केले, हे फार कमी लोक जाणतात. सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये स्वत: संजयने अशाच एका घटनेचा उल्लेख केला होता. ती घटना ऐकून सगळे स्तब्ध झाले होते. होय, संजयने या शोमध्ये सांगितले होते की, एकदा तो ड्रग्ज घेतल्यानंतर झोपी गेला होता.  जाग आली, तेव्हा त्याला जोरदार भूक लागली होती. संजयने आपल्या नोकराला खाण्यासाठी काही मागितले. पण अचानक नोकर संजयकडे बघून ओक्साबोक्सी रडू लागला. त्याला बघून संजयला काय झाले कळेना. काही तासानंतर त्याला कळले की, तो पूण  दोन दिवसानंतर शुद्धीवर आला होता. दोन दिवस ड्रग्जच्या नशेत नुसता झोपलेला होता. या एका घटनेनंतर संजयला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. ती म्हणजे, आत्ता या विळख्यातून सुटले नाही, हा विळखा अधिक घट्ट होईल. 
संजयच्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत. आता राजकुमार हिरानी यापैकी कुठल्या घटना पडद्यावर दाखवतात, ते लवकरच कळेल.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ नावाचा हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तूर्तास या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी अशा काही घटना या चित्रपटात  दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. या बायोपिकमध्ये अभिनेता  मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत.
Web Title: Sanjay Dutt was born after two days of taking drugs! The servant was crying for a meal!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.