Sanjay Dutt wanted to be the role of the father in his biopic | संजय दत्तला करायची होती आपल्या बायोपिकमध्ये वडिलांची भूमिका

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची शूटिंग जानेवारीत सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर करणार आहे. तर संजय दत्तचे वडील म्हणजेच सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल साकारत आहे. मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे की या चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका संजय दत्तला करायची होती. हो तुम्ही बरोबर वाचलात संजय दत्तला स्वत:च्या बायोपिकमध्ये आपल्या वडिलांची भूमिका करायची होती. संजय दत्तला माहिती आहे सुनील दत्त यांना त्याच्यापेक्षा जास्त चांगले कुणी ओळखत नाही पडद्यावर सुनील दत्त यांची भूमिका संजय दत्त पेक्षा चांगली कोणी साकारु नाही शकत. पण त्याला असे करणे थोडे वेगळे वाटले म्हणून त्यांने हा विचार सोडून दिला. तसेच बहिण प्रिया दत्तने ही या गोष्टीसाठी साफ नकार दिल्याचे समजतेय.  

राजू हिरानी ज्यावेळी या चित्रपटाची कथा लिहित होते त्यावेळी संजय दत्तच्या डोक्यात हा विचार आला होता की आपल्या वडिलांचा रोल आपल्या बायोपिकमध्ये आपणच साकारुया. ते असाच एकच व्यक्ती होते ज्यांनी संजय दत्तच्या आयुष्यात आलेले उतार-चढाव जवळून बघितले होते. संजय दत्त आपल्या वडिलांशी असलेले बाप-लेकाच नात अगदी घट होते म्हणून संजय दत्तच्या डोक्यात हा विचार आला होता. मात्र त्यांने ही गोष्ट राज कुमार हिनाला सुद्धा नाही सांगितली. 

संजय दत्तच्या बायोपिकमधअये रणबीर त्याच्या आयुष्यातील तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिसणार आहे. रणबीरने यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. रणबीर कपूरही संजय दत्तची भूमिका साकारताना खूपच उत्सुक दिसतोय. 

Web Title: Sanjay Dutt wanted to be the role of the father in his biopic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.