Sanjay Dutt tells new generation 'Stardom' | ​‘स्टारडम’ची आस बाळगणा-या नव्या पिढीला संजय दत्तने सांगितला नवा ‘फंडा’!

आपल्या करिअरमध्ये ‘स्टारडम’चा स्वाद घेऊन चुकलेला अभिनेता संजय दत्त आपल्या कमबॅकसाठी सज्ज आहे. पण नुसता सज्ज नाही तर सध्या संजय ‘सुपरस्टार’च्या रांगेत असलेल्या सगळ्या कलाकारांना एक प्रेमळ सल्ला देतानाही दिसतोय. होय, संजयने सर्व कलाकारांना एक बहुमोल सल्ला दिला आहे. ‘मल्टिप्लेक्स कल्चरच्या पलीकडे जावून विचार करा,’ असे त्याने म्हटले आहे. 
एका मुलाखतीत संजयने हा सल्ला दिला. नव्या कलाकारांना माझ्यासारखे स्टारडम हवे असेल तर त्यांनी केवळ मेट्रो सिटीतील चित्रपटगृहे किंवा मल्टिप्लेक्सचा विचार करणे सोडायला हवे. असे केले तरच शाहरूख खान,सलमानसारखे स्टारडम तुम्ही मिळवू शकता. नव्या पिढिला चित्रपट निवडताना अधिक जागृत असणे गरजेचे आहे. भारतात चित्रपट केवळ मल्टिप्लेक्समुळे चालत नाही. त्यापलीकडेही बरेच काही आहे. नवी पिढी जितक्या लवकर हे समजेल, तितक्या लवकर स्टारडम मिळवेल, असे संजय म्हणाला.
यावेळी बोलताना संजय स्वत:च्या यशाबद्दलही बोलला. मी कधीच परंपरागत हिरोच्या भूमिका स्वीकारल्या नाहीत. मग तो ‘मिशन काश्मीर’ असो वा ‘अग्निपथ’. मी हिरोच्या भूमिका नाही तर केवळ भूमिका साकारल्या. ‘अग्निपथ’मधील कांचा चीनाची भूमिका आजचा कुठलाही अभिनेता कदाचितच स्वीकारेल. पण मी ही भूमिका स्वीकारली. केवळ स्वीकारली नाही तर आव्हान म्हणून घेतली, असेही त्याने स्पष्ट केले.
आता संजयचा स्टारडम मिळवण्यासाठीचा हा फंडा नवीपिढीतील किती जण मनावर घेतात, ते ठाऊक नाही. पण संजयच्या बोलण्यात दम आहे, इतकेच मात्र नक्की. स्टारडमच्या नादात वेड्या झालेल्या काहींना हे जितक्या लवकर कळेल, तितके चांगले.

ALSO READ : पित्याच्या मृत्यूच्या १२ वर्षांनंतर संजय दत्तने पूर्ण केली त्यांची अखेरची इच्छा!

सध्या संजय ‘भूमी’ या त्याच्या आगामी चित्रपटात बिझी आहे. ‘भूमी’मध्ये अदिती संजयच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट बापलेकीच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. ५८ वर्षांचा संजय या चित्रपटात पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. उमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.   
Web Title: Sanjay Dutt tells new generation 'Stardom'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.