Sanjay Dutt started shooting for the upcoming movie | भूमीच्या रिलीज आधीचे संजय दत्तने सुरु केली आगामी चित्रपटाची शूटिंग

चित्रपट भूमीमधून या शुक्रवारी संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे, आपल्या कमबॅकला घेऊन संजूबाबा भलताच उत्साहि आहे. भूमी चित्रपटाच्या रिलीज आधी संजय दत्तच्या फॅन्ससाठी आणखीन एक गूडन्यूज आली आहे. भूमीनंतर संजय दत्त साहेब बीबी और गँगस्टर चित्रपटात दिसणार आहे. संजय दत्तच्या या चित्रपटाची शूटिंग आजपासून सुरु करण्यात आली आहे.  चित्रपट समीक्षक तरण आदर्शने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर चित्रपटाच्या मुहुर्त दरम्यानचा फोटो शेअर केला आहे.  
यात संजय दत्तसह चित्रांगदा सिंग, जिमी शेरगिल, माही गिस आणि कबीर बेदी आणि नफीसा अली यांच्या मुख्य भूमिका आहे. यात संजय दत्त एक गँगस्टरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे तर चित्रांगदा एक सिंगरच्या आणि डान्सरच्या भूमिकेत झळकणार आहे.  वास्तवमध्ये एका गँगस्टरची भूमिका संजय दत्तने साकारली होती आणि ती प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली होती. वास्तवनंतर पुन्हा एक गँगस्टर मोठ्या पडद्यावर साकारायला संजूबाबा तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वीच संजयने आपल्या नव्या चित्रपटातला लूक शेअर केला होता.   संजयने आपल्या भूमिकेसाठी नवा हेअरकट सुद्धा केले आहे. आपल्या फॅन्ससोबत त्यांना नव्या लुकमधला फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोला  त्यांने कॅप्शन दिले होते, ' साहेब बीवी गँगस्टरसाठी नव्या लुकबाबत धन्यवाद''. साहेू बीवी और गँगस्टर चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे.  

ALSO READ : संजय दत्तला पत्नी मान्यता जोड्याने मारायची; विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे!

सध्या संजय दत्त आपला आगामी चित्रपट भूमीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात संजय दत्त, अदिती राव हैदरी आणि सिद्धांत गुप्ता यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार केले आहे. या चित्रपटा बाप मुलीच्या नात्यावर आधारित आहे. यात संजय दत्तच्या मुलीची भूमिका आदितीने साकारली आहे. सेन्सॉरने या चित्रपटातील तब्बल 13 सीन्स कट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे संजय दत्तचे चाहते नक्कीच नाराज झाले असतील. यात सनी लिओनीचे आयटम साँग सुद्धा पाहायला मिळाणार आहे. सनीचे हे आयटम सॉँग चित्रपटाच्या अखेरीस दाखविण्यात येणार आहे.
Web Title: Sanjay Dutt started shooting for the upcoming movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.