Sanjay Dutt regrets losing Sujoy Ghosh's 'Badla'? | ‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त! अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस!!
‘बदला’ सोडून पस्तावतोय संजय दत्त! अमिताभ बच्चन यांनी केले रिप्लेस!!

संजय दत्तचे पुनरागमन फसलेय, हे आता सिद्ध झालेय़ सध्या तरी हेच चित्र आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण संजयचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटाला अगदी १० कोटीपर्यंतही मजल मारता आली नाही. गत महिन्यात संजयचा ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ रिलीज झाला. या चित्रपटाकडून संजयला प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपटही सुपरडुपर फ्लॉप झाला. या दोन चित्रपटाच्या अपयशानंतर संजूबाबा कमालीचा चिंतीत असल्याचे कळतेय. नाही म्हणायला संजयच्या
‘तोरबाज’चे शूटींग पूर्ण झालेय. पण संजूबाबाच्या दोन फ्लॉपनंतर वितरक या चित्रपटाला हात लावायला तयार नाहीत. अशात संजयला राहून राहून एका गोष्टीचा पश्चाताप होतोय. तो कुठला तर सुजॉय घोष यांचा ‘बदला’ हा चित्रपट सोडल्याचा.

 होय, ‘भूमी’ आणि ‘बदला’ हे दोन्ही चित्रपट संजयला एकाच वेळी आॅफर झाले होते. पण तेव्हा संजूने सुजॉय यांच्याऐवजी ‘मॅरीकॉम’च्या यशामुळे भारावलेल्या ओमंग कुमार यांची निवड केली. सुजॉय आणि ओमंग कुमार दोघांच्याही चित्रपटात सूडकथा आहे. पण ओमंग कुमार बडे नाव आहे, असे वाटून संजयने ‘भूमी’ची निवड केली. त्याचे परिणाम आपण सगळेच बघत आहोच.
संजयने ‘बदला’ नाकारल्यावर त्याच्याजागी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची वर्णी लागली. सध्या यशाच्या शिखरावर असलेली तापसी पन्नूही त्यांच्यासोबत आहे. शाहरूख खानची कंपनी हा चित्रपट प्रोड्यूस करतेय.

 


Web Title: Sanjay Dutt regrets losing Sujoy Ghosh's 'Badla'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.