Sanjay Dutt to marry his wife; Can not believe? But this is the fact! | संजय दत्तला पत्नी मान्यता जोड्याने मारायची; विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे!

अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर हा त्याचा कमबॅक चित्रपट आहे. दरम्यान, संजूबाबाने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासावरही बरेच काही सांगितले. शिवाय प्रत्येक संकट काळात धीर देणाºया पत्नी मान्यताविषयीदेखील त्याने भाष्य केले. परंतु पत्नीविषयी सांगताना त्याने एक गोष्ट अशी सांगितली की, त्याचा तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, चेष्टामस्करीत संजूबाबा असे काही बोलून गेला की, त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. होय, संजूबाबाने म्हटले की, पत्नी मान्यता मला माझ्याच जोड्यांनी मारत असे. 

डीएनएने एका टीव्ही रिपोर्टचा संदर्भ देताना संजय दत्तच्या कस्टम मेड शूजविषयी चर्चा केली. या शूजची निर्मिती मॅक्सिकोमध्ये करण्यात आली आहे. जेव्हा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा संजूबाबाने चेष्टामस्करीत या शूजचा वापर माझी पत्नी मला मारण्यासाठी करीत असे, असे सांगितले. संजय दत्तने म्हटले की, ‘हे आहेत माझे शूज, हे शूज हातांनी बनविले आहेत. आग्रा येथील मोची (चांभार) अशाप्रकारचे शूज बनवू शकत नाहीत. या शूजचा मोची मॅक्सिकोमधील आहे. मॅक्सिकोमधील ही कंपनी मी मोठ्या मुश्किलीने शोधून काढली आहे. त्या मोचीच्या दुकानाचे नाव ‘बॅक अ‍ॅट द रॅन्च’ असे आहे.’ 
 

संजयने पुढे म्हटले की, ‘त्यांनी मला कॅटलॉग पाठविले होते. हे शूज लेदरचे नव्हे तर प्लॅस्टिकपासून बनविलेले आहेत. माझ्याकडे अशाप्रकारचे बरेचसे शूज आहेत. ज्याचा वापर माझी पत्नी मान्यता माझ्या डोक्यात मारण्यासाठी करीत असे.’ असो हा सर्व चेष्टामस्करीचा भाग असावा. वास्तविक संजूबाबा आणि मान्यतामध्ये खूप प्रेम आहे. मान्यता नेहमीच संजूबाबासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. फोटोमध्ये हे कपल खूपच क्यूट वाटते. 

असो, संजूबाबाचा ‘भूमी’ हा चित्रपट उद्या रिलीज होत असून, त्यामध्ये संजय दत्त एका वडिलांची भूमिका साकारताना दिसत आहे. तर त्याच्या मुलीच्या भूमिकेत आदिती राव हैदरी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंक कुमार यांनी केले आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला १३ कट्स लावले होते. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून, चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरेल, असा अंदाज समीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. 
Web Title: Sanjay Dutt to marry his wife; Can not believe? But this is the fact!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.