sanjay dutt got angry on media out side his house on diwali night | दिवाळीत संजय दत्तने पत्रकारांना दिली शिव्यांची ‘भेट’!!
दिवाळीत संजय दत्तने पत्रकारांना दिली शिव्यांची ‘भेट’!!

बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकीचं एक व्हिडिओ आहे तो संजय दत्तचा. या व्हिडिओत संजय दत्त आपल्या कुटुंबासोबत दिवाळी पार्टी साजरा करतांना दिसतोय. पण या व्हिडिओतील संजू बाबाचे वागणे अनेकांना खटकले आहे. होय, व्हिडिओत तो मीडियाच्या फोटाग्राफर्ससाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दिसतो आहे.


दिवाळी पार्टीनंतर संजय पत्नी मान्यता व मुलांसह फोटोग्राफर्सला पोज देण्यासाठी बाहेर येतो. संजूबाबत फोटोसाठी उभा तर होतो. पण फोटोग्राफर्सनी वारंवार विनंती करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. कधी तो जमिनीकडे बघतो, कधी मुलांकडे तर कधी भलतीकडे. यादरम्यान काही फोटोग्राफर्स संजूबाबाला दिवाळीच्या शुभेच्छा देतात. संजूबाबाही त्यांना विश करतो. मुलांनाही विश करायला सांगतो. यानंतर अख्खे कुटुंब आत जाते. इथपर्यंत सगळे काही ठीक असते. पण काही वेळानंतर संजय पुन्हा बाहेर येतो. फोटोग्राफर्स पुन्हा त्याला पोज देण्याची विनंती करतात. मग मात्र संजय भडकतो आणि जवळच्या एका व्यक्तिला फोटोग्राफर्सना येथून जाण्यास सांगण्याचे आदेश देतो.

  मीडियाचे फोटोग्राफर्स यानंतरही जात नाही म्हटल्यावर तो आणखीच संतापतो आणि फोटोग्राफर्सला शिव्या देताना दिसतो. घरी जा ना, तुमच्या घरी दिवाळी नाही का, असे तो तावातावात म्हणतो. मीडियाला शिव्या दिल्यानंतर तो घरात जातो आणि यानंतर लगेच संजूबाबाच्या घराच्या बाहेरचे दिवे बंद होतात.
तूर्तास संजय दत्त तोरबाज, प्रस्थानम, कलंक, पानीपत अशा अनेक चित्रपटांत बिझी आहे.


Web Title: sanjay dutt got angry on media out side his house on diwali night
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.