Sanjay Dutt gave to former jailer 'magic ke zapi' !! | ​संजय दत्तने माजी ‘जेलर’ ला दिली ‘जादू की झप्पी’!!

संजय दत्त कदाचित आजही येरवडा तुरुंगात घालवलेले दिवस विसरू शकलेला नाही. कदाचित विसरूही शकणार नाही. अलीकडे संजय दत्त दत्तला विमानतळावर एक व्यक्ति भेटली आणि संजयने या व्यक्तिला कडकडून मिठी मारली. अर्थात ‘जादू की झप्पी’ दिली. ही व्यक्ती कोण होती तर माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक(तुरुंग) मीरा बोरवणकर. होय, कसाब आणि याकुब मेमन यांच्या फाशीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणा-या मीरा चड्ढा बोरवणकर गत शनिवारीब्युरो आॅफ पोलिस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटच्या डायरेक्टर जनरलपदावरून निवृत्त झाल्या. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी संजयचा हा किस्सा सांगितला.संजय दत्तला मुंबईच्या आॅर्थर रोड तुरुंगातून पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आले तेव्हापासून तर संजूबाबाच्या तुरुंगातील वागणुकीबद्दल मीरा बोरवणकर बोलल्या.

त्यांनी सांगितले की, मुंबईहून येरवड्यात संजयला हलवणे कठीण होते. कारण मीडिया आणि सामान्य लोकांपासून लपवून आम्हाला संजयला हलवायचे होते. आधी आम्ही त्याला हलविण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फसला. संजयला आणण्यासाठी मी दोन डीआयजी मुंबईला पाठवले होते. पण  आॅर्थर रोडमध्ये असलेला संजय प्रचंड नर्व्हस होता आणि त्यानेयेण्यास नकार दिला. पण दुस-यांदा केवळ एक डीआयजी गेला अन् संजयला येरवड्यात आणले गेले. विशेष म्हणजे, मीडिया आणि सामान्य लोकांना कळू न देता संजयला मुंबईहून पुण्याला हलवले गेले. या केसमध्ये संपूर्ण मीडियाचे आणि लोकांचे आमच्यावर लक्ष होते. त्यामुळे आम्ही अतिशय सावध होतो. संजयला तुरुंगातील अन्य कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळावी, याबद्दल आम्ही आग्रही होतो. संजयला घरचे जेवण मिळावे, असा आदेश होता. पण आम्ही त्यावर आक्षेप नोंदवला होता.   केवळ कच्च्या कैद्यांना घरचे जेवण मिळू शकते. दोष सिद्ध झालेल्या आरोपींना नाही, हा मुद्दा आम्ही लावून धरला. त्यामुळे संजयला तुरूंगातील जेवण दिले गेले आणि संजयनेही कुठलीही तक्रार न करता ते स्वीकारले. तुुरुंगात तो अतिशय शिस्तीत वावरला. एकदिवस मी येरवड्याला अनपेक्षित भेट देण्याचे ठरवले. संजय आहे त्याठिकाणी मी गेले. तो माझ्याशी बोलला. मॅडम, मला तुमच्याबद्दल सगळे काही माहित आहे. माझा जन्म, माझे शिक्षण, पंजाबी कुटुंबातील माझा जन्म सगळे त्याने मला सांगितले. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.
गत आठवड्यात मी मुंबई विमानतळावर होते.  मी मागे वळले तर माझ्या मागे संजय दत्त उभा होता. मी कोण हे मी त्याला सांगितले. त्याला आश्चर्य वाटले. ओह मॅम, असे आश्चर्याने तो मला म्हणाला आणि एकक्षण थांबून, मी तुम्हाला हग करू शकतो का? असे त्याने मला विचारले.
Web Title: Sanjay Dutt gave to former jailer 'magic ke zapi' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.