Sania says, 'I am the originator of the Sajid' | सानिया म्हणते, ‘मीच साजीदची ओरिजनल धन्नो’

हाऊसफुल या चित्रपटातील आयटम साँग ‘धन्नो’ व हाऊसफु ल 2 मधील ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यासाठी मी साजीदची पहिली पसंती होती, शिवाय आयटम नंबरसाठी त्याने मला विचारणा केली होती असा खुलासा भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने साजीद खानसमोरच केला. 

अभिनेत्री परिणीती चोप्रा व टेनिसपटू सानिया मिर्झा यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांच्या या मैत्रीचे रहस्य उलगताना ती खूपच सहज दिसून आली. टेनिस व्यतिरिक्त आपल्या आठवणी सांगताना ती म्हणाली, चित्रपटातील आयटम नंबरची विचारणा केल्यावर साजीदने मला एक्सपोझ न करण्याविषयी सांगितले होते.

भोजपुरी सिनेमात सानियाच्या नावाचा उल्लेख असलेल्या गाण्याविषयी ती हसून म्हणाली, माझ्यावर तीन गाणी आहेत, ही गाणी तुम्ही गुगलवर सहजपणे शोधू शकता. याचवेळी ‘सानिया की नथनिया’ हे भोजपुरी गीत सादर करण्यात आले. टेनिसमधील तिचा ग्लॅमरस अवताराचे मीडियात पोस्ट झालेले पोझ पाहताच ती चांगलीच लाजली. 

सानियाने या रहस्याचा उलगडा केला खरा मात्र, ती चित्रपटात आयटम नंबर करताना दिसली असती तर अनेक सिने तारकांना आपल्या करिअरची चिंता करावी लागली असती असेच तिला सुचवायचे नसेल ना! ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यात मलायका अरोरा तर धन्नो या आयटम नंबरमध्ये जॅकलिन फर्नांडिझ यांनी कहर केला होता. विशेष म्हणजे परिणीती चोप्राने देखील अनेक चित्रपटात आयटम नंबर केले आहेत. सानियाने परिणितीलाच हा दम दिला नसणार ना!
Web Title: Sania says, 'I am the originator of the Sajid'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.